AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahesh Kothare : ते नुकतेच मुख्यमंत्री झालेले अन्…शरद पवार यांचं ‘झपाटलेला’ सिनेमाशी आहे खास कनेक्शन; महेश कोठारे यांनी सांगितला किस्सा

Mahesh Kothare On Sharad Pawar : शरद पवार यांचं 'झपाटलेला' सिनेमासोबत खास कनेक्शन आहे. याबद्दल एका मुलाखतीत महेश कोठारे यांनी सांगितलं होतं.

Mahesh Kothare : ते नुकतेच मुख्यमंत्री झालेले अन्...शरद पवार यांचं 'झपाटलेला' सिनेमाशी आहे खास कनेक्शन; महेश कोठारे यांनी सांगितला किस्सा
| Updated on: Nov 14, 2026 | 5:31 PM
Share

महेश कोठारे यांचा ‘झपाटलेला‘ हा सिनेमा 1993 मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, विजय चव्हाण यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. पण, तुम्हाला माहित आहे का? ‘झपाटलेला‘ या सिनेमाशी शरद पवार यांचं खास कनेक्शन आहे. याबद्दल महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं. महेश कोठारे म्हणालेले की, ‘जेव्हा माझा चित्रपट ‘झपाटलेला’ आला तेव्हा माझी अशी इच्छा होती की, मराठीतला पहिला चित्रपट परदेशात प्रदर्शित करायचा. कारण चित्रपट गाजला होता आणि लोकांना खूप आवडला होता. तर मला असं वाटलं हा चित्रपट आपण लंडनमध्ये प्रदर्शित करूया. लंडनमध्ये बऱ्यापैकी मराठी प्रेक्षक आहेत. त्यामुळे आम्ही मग लंडनला गेलो. आमचं सगळं कुटुंब गेलं होतं. आम्ही फिरायला म्हणून गेलो होतो. तेव्हा म्हटलं, आपल्याला तिकडे प्रिमियर करता येतो का? बघू या.’

महेश कोठारे पुढे म्हणाले की, ‘माझा सख्खा चुलत दूरचा भाऊ होता. आता तो हयात नाहीये. मधूकर कोठारे असं त्याचं नावं. तेव्हा लंडनमध्ये तो लोकप्रिय होता. त्याची पत्नी शिला कोठारे. त्यावेळेला लंडनचं मराठी महामंडळ होतं त्याची शिला वहिनी अध्यक्ष किंवा सेक्रेटरी होती. लंडनला गेल्यानंतर त्यांच्या पुढ्यात मी माझी इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, येस, कल्पना मस्त आहे. मी नियोजन करते. आपण प्रीमियर इथे करायचा. तिनं तिथल्या सगळ्या मराठी लोकांना याबाबत सांगितलं. पत्रक, वेबसाईट, इ-मेल या माध्यमातून तिनं सगळ्यांना कळवलं. तो शो हाऊसफुल्ल झाला. आम्ही 13 फेब्रुवारी 1994 साली हा प्रीमियर केला होता. पण त्यावेळेला आम्ही सगळे परत आलो होतो. त्यामुळे प्रीमियरसाठी पुन्हा लंडनला जायला लागलं होतं.’

सिनेमाशी शरद पवार यांचं कनेक्शन 

‘माझ्या चुलत बहिणीचे पती होते, जे माझे मित्र होते. त्याची शरद पवारांबरोबर चांगली ओळख होती. माझी पण ओळख होती. पण त्याची अधिक चांगली ओळख होती. मग तो मला शरद पवारांकडे घेऊन गेला. तेव्हा शरद पवार इतके व्यग्र होते ना! त्यावेळेस ते नुकतेच मुख्यमंत्री झाले होते. तसंच तेव्हा बॉम्बस्फोट झाले होते, बॉम्बस्फोटानंतर त्यांना मुख्यमंत्री म्हणून आणलं होतं. तेव्हा त्यांच्याकडे खूप कामं होती. सतत भेटीगाठी सुरू होत्या. मला त्यांनी कसाबसा वेळ दिला होता. त्यांनी मला लगेच आतमध्ये बोलावलं. मला वेळ नाहीये, लवकर आतमध्ये या, काय आहे सांग लवकर. मी म्हटलं, असं असं आहे वगैरे. आटकेपार झेंडा वगैरे शब्द वापरले. लंडनला पुन्हा जायचं आहे तर माझ्याकडे तेवढा फंड नाहीये, असं मी त्यांना म्हटलं. ते म्हणाले, ओके तू आता जा. मला आता वेळ नाहीये वगैरे.’

‘त्यामुळे मला वाटलं आता काही होणार नाही. पण, दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन आला तुमचा चेक तयार आहे घेऊन जा. मी लगेच म्हटलं तयारीला लागा, तिकिट काढा, मी चाललो. यावेळी मी एक जाहिरात दिली होती. माननीय मुख्यमंत्री शरद पवार यांच्या आशीर्वादानं तात्या विंचू निघाला लंडनला. असं महेश कोठारे यांनी शेवटी सांगितलं.’ ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत महेश कोठारे बोलत होते.

Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!