8th Pay Commission: दिवाळीआधी DA वाढला, कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ? 8 व्या वेतन आयोगाची अपडेट काय?

8th Pay Commission Update: दिवाळीच्या तोंडावर सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला. तर संघटनांच्या कर्मचार्‍यांच्या वेतनावर परिणाम होणार , 8 व्या वेतन आयोगाची अपडेट काय?

8th Pay Commission: दिवाळीआधी DA वाढला, कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ? 8 व्या वेतन आयोगाची अपडेट काय?
दिवाळीआधी DA वाढला, कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ? 8 व्या वेतन आयोगाची अपडेट काय?
| Updated on: Nov 01, 2026 | 12:00 PM

8th Pay Commission Update: सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय झाला. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय झाला. विशेष म्हणजे 1 जुलै 2026 रोजीपासून पूर्वलक्षी प्रभावाने डीए लागू होणार आहे. या निर्णयामुळे महागाई भत्ता 60 टक्क्यांहून थेट 63 टक्क्यांपर्यंत जाईल. त्याचा फायदा देशातील 48.54 लाख सरकारी कर्मचारी आणि 68.71 लाख सेवा निवृत्तीधारकांना होईल. पण त्याचवेळी 8 व्या वेतन आयोगासाठीही कर्मचाऱ्यांनी महागाई भत्त्याविषयी मोठी मागणी केली आहे. यामुळे पगाराचे गणितच बदलून जाईल.

8 वा वेतन आयोग

Loading...

3 नोव्हेंबर 2025 रोजी रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 8 वा वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली. आता या आयोगाच्या शिफारशी काही महिन्यानंतर सादर होतील. त्यानंतर त्याला मंजूरी देण्यात येईल. आयोगाचे काम गतीने सुरू आहे. आताच आयोगाचे सदस्य हे मुंबई दौऱ्यावर होते. हा अहवाल सादर करेपर्यंत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याचे गिफ्ट दिले आहे. वेतन आयोगाचे गणित हे फिटमेंट फॅक्टरवर राहणार आहे. तर डीएसंदर्भात विविध संघटनांनी मोठ्या मागण्या केल्या आहेत.

महागाई भत्त्यासंदर्भात कर्मचाऱ्यांची मागणी काय?

केंद्रीय कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टरसोबतच महागाई भत्त्याविषयी सुद्धा सुधारणांचा रेटा लावला आहे. दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढवण्याऐवजी तो दर तीन महिन्यांनी वाढवावा अशी एक मोठी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. याशिवाय कर्मचारी संघटनांनी आयोगासमोर महागाई भत्ता हा आयकरमधून वगळण्याचीही मागणी केली आहे. तर महागाई भत्ता 25 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यावर थेट मूळ वेतनात तो जोडण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

सध्याच्या डीए वाढीचा काय परिणाम?

महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात वाढ होईल. ज्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे. अशा कर्मचाऱ्यांना आधी 10,800 रुपये डीए मिळतो होता. तो आता 11,340 रुपये होईल. त्यांच्या पगारात दरमहा 540 रुपयांची वाढ होईल. तर वरिष्ठ  कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात दरमहा, 1500 ते 3,000 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांची थकबाकी कर्मचाऱ्यांना आगामी वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us