AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओ IPO पूर्वी आकाश अंबानींचा मोठा प्लॅन; 10 कोटी घरांपर्यंत पोहोचणार ब्रॉडबँड सेवा

जिओ प्लॅटफॉर्म्सेचे मॅनेजिंग डिरेक्टर आकाश अंबानीने आपल्या कंपनीच्या भविष्यातील योजनांचा खुलासा केला आहे. जिओचे ब्रॉडबँड नेटवर्क सध्या सुमारे 4 कोटी घरांपर्यंत पोहोचले असून, ही व्याप्ती वाढवून 10 कोटी घरांपर्यंत नेण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

जिओ IPO पूर्वी आकाश अंबानींचा मोठा प्लॅन; 10 कोटी घरांपर्यंत पोहोचणार ब्रॉडबँड सेवा
| Updated on: Oct 15, 2026 | 8:14 PM
Share

रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम आणि डिजीटल कंपनी जिओ, ही आता फक्त मोबाईल आणि इंटरनेटपुरती मर्यादित राहू इच्छित नाही. घराघरांत ब्रॉडबँड पोहोचवणे, उद्योगपतींना डिजीटल सुविधा पुरवणे आणि आपलं तंत्रज्ञान वपरदेशात विकण्याची कंपनीची योजना आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचे मॅनेजिंग डिरेक्टर आकाश अंबानी यांनी 15 ऑक्टोबर रोजी कंपीनच्या भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली. प्रत्येक भारतीय घर, नागरिक आणि उद्योगाला चांगली आणि फायदेशीर सेवा उपलब्ध करून देणं हे जिओचं लक्ष्य आहे. पंतप्रधानांच्या डिजीटल इंडिया, मेक इन इंडिया आणि विकसित भारत 2047 च्या व्हिजनपासूनही या योजनेला प्रेरणा मिळाली आहे.

10 कोटी घरांपर्यंत ब्रॉडबँड पोहोचवण्याचं लक्ष्य

जिओच्या विकासात होम ब्रॉडबँड म्हणजेच घराघरांत इंटरनेट पोहोचवण्याची महत्त्वाची भूमिका असेल, असं आकाश अंबानी यांनी सांगितलं. सध्या सुमारे कोटी घरांपर्यंत ब्रॉडबँड सेवा पोहोचवण्याची कंपनीची क्षमता आहे. आता ही क्षमता वाढवून 10 कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचं टार्गेट आहे. यासाठी जिओ सुमारे 19 हजार पिन कोड असलेल्या भागांमध्ये आपली सेवा विस्तारू इच्छिते. एवढंच नव्हे तर कंपनी इंटरनेटसोबत टीव्ही आणि डिजिटल ॲप्ससारख्या सुविधाही उपलब्ध करून देत आहे, जेणेकरून ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक सेवा मिळू शकतील. जिओच्या ब्रॉडबँड सेवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कंपनीच्या स्वतःच्या UBR तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही इंटरनेटचा विस्तार करण्याची योजना आहे.

मोबाइल आणि 5G मुळेही व्यवसायाला चालना

30 जून 2026 पर्यंत जिओचे 53.33 कोटी ग्राहक होते. त्यापैकी 28.5 कोटी ग्राहक 5G सेवांचा वापर करत होते. भारतातील एकूण वायरलेस डेटा ट्रॅफिकपैकी 60 टक्क्यांहून अधिक डेटा जिओच्या नेटवर्कमधून जातो. जिओच्या एका ग्राहकाचा सरासरी मासिक डेटा वापर 43.7 GB पर्यंत पोहोचला आहे. जिओची सुरुवात झाल्यानंतर भारतातील इंटरनेटचा सरासरी डाउनलोड स्पीड सुमारे 2.5 Mbps वरून वाढून जवळपास 68 Mbps झाल्याचं आकाश अंबानी यांनी सांगितलं.

कंपन्यांना डिजिटल सेवा देण्यावर भर

जिओ आता व्यावसायिक कंपन्यांना डिजिटल सेवा पुरवण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे. आकाश अंबानी यांच्या मते, भारतातील एंटरप्राइज डिजिटल सर्व्हिसेसची संभाव्य बाजारपेठ सुमारे 56 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 5.1 लाख कोटी रुपये इतकी आहे. या बाजारपेठेत बँकिंग, विमा, हॉटेल्स आणि इतर व्यवसायांसाठी सुरक्षित इंटरनेट, निगराणी व्यवस्था आणि डिजिटल सोल्यूशन्स यांचा समावेश होतो. जिओच्या दाव्यानुसार, देशातील सुमारे 65 टक्के बँक शाखा तिच्या नेटवर्कशी जोडलेल्या आहेत. या व्यवसायातील आपला वाटा वाढवण्याची कंपनीची योजना आहे.

जिओला केवळ इतर कंपन्यांच्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहायचे नाही. आकाश अंबानी यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने भारतात आणि परदेशात मिळून 7220 पेटंट अर्ज दाखल केले आहेत. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 12 हजारांहून अधिक अभियंत्यांची टीम काम करत आहे. कंपनीने स्वतःचे नेटवर्क तंत्रज्ञान, उपकरणे आणि डिजिटल सेवा विकसित करण्यावर भर दिला आहे. तसेच जिओ 12 भारतीय भाषांमध्ये AI आधारित व्हॉइस सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

21 ऑक्टोबरपासून Jio Platforms चा IPO होणार खुला

जिओ प्लॅटफॉर्म्स आता शेअर बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, तिचा IPO 21 ऑक्टोबर रोजी खुला होईल आणि 23 ऑक्टोबर रोजी बंद होईल. या IPO साठी शेअरची किंमत 1,065 ते 1,119 रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे. कंपनी या इश्यूद्वारे 27 कोटींपर्यंत नवीन शेअर्स जारी करू शकते. वरच्या किंमतपट्ट्यानुसार, या IPO मधून सुमारे 30,213 कोटी उभारले जाऊ शकतात. या इश्यूमध्ये सध्याच्या गुंतवणूकदारांकडून त्यांचे शेअर्स विकण्याचा प्रस्ताव समाविष्ट नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजकडे जिओ प्लॅटफॉर्म्सची 66.43 टक्के हिस्सेदारी आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक