AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambani : अंबानींचा नवा डाव,अवघ्या 10 रुपयांत आणलं आईस्क्रीम; रिलायन्सच्या खेळीने कंपन्यांची उडाली झोप !

रिलायन्सने ‘बॉम्बे क्रीमरी’च्या माध्यमातून आईस्क्रीम बाजारात 10 रुपये किमतीत दमदार प्रवेश केला. आता अंबानी ग्राहकांच्या फ्रीजपर्यंत पोहोचणार आहेत. या आक्रमक किंमत धोरणामुळे अमूल आणि क्वालिटी वॉल्ससारख्या ब्रँड्सना मोठे आव्हान निर्माण झालं आहे.

Ambani : अंबानींचा नवा डाव,अवघ्या 10 रुपयांत आणलं आईस्क्रीम; रिलायन्सच्या खेळीने कंपन्यांची उडाली झोप !
Ambani New move
| Updated on: Sep 02, 2026 | 3:37 PM
Share

रिलायन्स (Reliance) कंपनी पुन्हा एकदा बाजारात खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाली आहे. टेलिकॉम क्षेत्रात जिओच्या माध्यमातून गेमचेंजर ठरल्यानंतर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता थेट जनसामान्यांच्या फ्रीजपर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स (RCPL) ने आईस्क्रीम सेगमेंटमध्ये ‘बॉम्बे क्रीमरी’ या नावाने प्रवेश केला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची किंमत. कप, कोन आणि स्टिक अशा विविध प्रकारच्या आईस्क्रीमची सुरुवातीची किंमत अवघी 10 रुपये ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला हा ब्रँड पश्चिम भारतात उपलब्ध करून दिला जात असून, त्यानंतर देशभर विस्तार करण्याची रिलायन्सची योजना आहे.

कंपन्यांच्या शेअर्सवरही दिसला परिणाम

रिलायन्सच्या या आक्रमक एंट्रीचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. आईस्क्रीमची ही बातमी समोर येताच बुधवारी बीएसईवर क्वालिटी वॉल्सच्या शेअरमध्ये जवळपास 3 टक्क्यांची घसरण झाली आणि शेअरची किंमत 43 रुपयांपर्यंत खाली आली. विशेष म्हणजे, हा सलग सातवा ट्रेडिंग दिवस होता, जेव्हा कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली. या कालावधीत शेअरमध्ये एकूण सुमारे 11 टक्क्यांची घट झाल्याचं दिसून आलं.

दरम्यान, अमूलचे मँगो फ्लेवर स्टिक किंवा काश्मीरी केशर कुल्फीसारखे पदार्थ हे झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी इन्स्टामार्टसारख्या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर साधारणपणे 20 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीत मिळतात. त्यामुळे 10 रुपयांच्या किंमतीसह बॉम्बे क्रीमरीची एंट्री ही सध्याच्या कंपन्यांसाठी मोठं आव्हान ठरू शकते. त्यांची डोकेदुखी वाढू शकते.

गुणवत्तेशी तडजोड नाही, अस्सल डेअरी क्रीमचा वापर

भारतातील आईस्क्रीम बाजार सध्या वेगाने विस्तारताना दिसतोय. वाढतं तापमान, वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटा आणि ग्राहकांची खर्च करण्याची वाढलेली ऐपत यामुळे आईस्क्रीमची मागणी वाढताना दिसते. हीच संधी साधून रिलायन्सने आक्रमक रणनीती आखल्याचं दिसत आहे. मात्र, कमी किंमत ठेवताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आलं.

बॉम्बे क्रीमरी आईस्क्रीममध्ये अस्सल डेअरी क्रीमचा वापर करण्यात आला आहे. भारतीय कुटुंबांच्या बजेटमध्ये चांगल्या गुणवत्तेचं आईस्क्रीम उपलब्ध करून देणं हा कंपनीचा उद्देश असल्याचं RCPLचे संचालक टी. कृष्णकुमार यांनी स्पष्ट केलं. सध्या पारंपरिक व्हॅनिला आणि चॉकलेट फ्लेवर्ससोबतच सॉल्टेड कॅरमेल, माचा आणि तिरामिसूसारख्या प्रीमियम फ्लेवर्सनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. क्विक-कॉमर्स ॲप्समुळे अशा उत्पादनांची मागणी आणखी वाढली आहे.

कॅम्पा कोलानंतर आईस्क्रीममध्येही आक्रमक रणनीती

रिलायन्सने कमी किमतीत मोठ्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची रणनीती यापूर्वीही वापरली होती. कॅम्पा कोला ब्रँडच्या पुनरागमनावेळी कंपनीने 200 मिलीच्या बाटलीची किंमत फक्त 10 रुपये इतकीच ठेवली होती. या आक्रमक किंमत धोरणामुळे सॉफ्ट ड्रिंक बाजारात मोठी स्पर्धा निर्माण झाली आणि जुन्या कंपन्यांनाही आपल्या रणनीतीमध्ये बदल करणं भाग पडलं होतं. कॅम्पा कोलाच्या वाढत्या व्यवसायामुळे रिलायन्सच्या या रणनीतीचे यश दिसून आलं होतं. 2026 या आर्थिक वर्षामध्ये कॅम्पाची ग्रॉस सेल 4,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे आता याच धर्तीवर ‘बॉम्बे क्रीमरी’च्या माध्यमातून रिलायन्स आईस्क्रीम बाजारात मोठा हिस्सा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

एक्सपर्ट मार्केट रिसर्चच्या अंदाजानुसार, भारतातील आईस्क्रीम बाजार सुमारे 15 टक्के वार्षिक चक्रवाढ दराने (CAGR) वाढत आहे. 2035 पर्यंत हा बाजार तब्बल 16.10 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. विशेषतः छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात आईस्क्रीमची मागणी वाढत असल्याने नव्या ब्रँड्ससाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

रिलायन्सने आपल्या मजबूत वितरण नेटवर्कचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला असून रिटेल दुकानांमध्ये विशेष फ्रीझर्स बसवत बॉम्बे क्रीमरीच्या प्रॉडक्ट्सची व्हिजीबिलीटी वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे जर बॉम्बे क्रीमरीला कॅम्पा कोलाप्रमाणेच ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, तर देशातील पारंपरिक आईस्क्रीम ब्रँड्ससमोर मोठे आव्हान उभं राहू शकतं.

Follow Us
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी फिरवला डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या
Mega Bharti | 1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या माहिती
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर...
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर मोठं संकट, 4-5 दिवसांत पाऊस नाही तर...
हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार!
Laxman Hake | हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार! लक्ष्मण हाकेंनी GR जाळून सरकारला सुनावलं
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडणार? भाजपा नेत्याचा दावा काय?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
Asim Sarode | शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
भुजबळांसह 3 मंत्र्यांचा ओबीसी उपसमितीच्या बैठकीतून बहिष्कार
OBC Reservation | ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मोठा राडा! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून बहिष्कार; निधीवरून सरकारला घेरलं
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...
महागाईचा भडका कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुळेंनी सरकारला घेरलं
Supriya Sule | सण तोंडावर, महागाईचा भडका! कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं
ठाकरे गटाची बाजू... शिवसेना सुनावणी आधीच मोठा धमाका? बड्या वकिलाचं...
ठाकरे गटाची बाजू... शिवसेना सुनावणी आधीच मोठा धमाका? बड्या वकिलाचं विधान चर्चेत