AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर… मुकेश अंबानी यांची पुन्हा घसरण… या उद्योजकाने हिसकावला दुसरा क्रमांक

Mukesh Ambani Networth: जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर झाला आहे. ताजा रँकिंगनुसार आशियातील या टेक कंपनीच्या उद्योजकाने यादीत मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे दुसर्‍या क्रमांकावरील उद्योगपती मुकेश अंबानी यांची तिसर्‍या क्रमांकावर घसरण झाली आहे.

श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर... मुकेश अंबानी यांची पुन्हा घसरण... या उद्योजकाने हिसकावला दुसरा क्रमांक
मुकेश अंबानी यांची घसरणImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 04, 2026 | 10:02 AM
Share

Asia’s Richest List: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मोठा उलटफेर झाला आहे. टिकटॉकची पालक कंपनी बाईटडांसचे सहसंस्थापक झांग यिमिंग यांनी भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. झांग यिमिंग हे आता श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर अंबानी हे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले आहेत. बाईटडांस कंपनीचे मूल्य वाढल्याने आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, AI क्षेत्रात कंपनीने वेगाने पुढे जात असल्याने कंपनीने मोठी घोडदौड केली आहे. त्याचा फायदा झांग यिमिंग यांना झाला आहे.

किती आहे झांग यिमिंग यांची संपत्ती?

ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, झांग यिमिंग यांची एकूण संपत्ती वाढून 92.8 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. या नवीन घाडमोडींमुळे ते चीनमधील सर्वात श्रीमंत उद्योजक ठरले आहेत. नवीन प्रकल्प हाती घेतल्याने त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. झांग यिमिंग यांच्या संपत्तीत मोठी उसळी आली आहे. टिकटॉक जगात पुन्हा लोकप्रिय ठरले आहे. बाईटडांसचे AI चॅटबॉट डौबाओ (Doubao) लोकप्रिय आहे. Doubao चे 30 कोटींहून अधिक युझर्स आहेत. हा चीनमधील सर्वाधिक लोकप्रिय AI चॅटबॉट आहे.

यादीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी कुठे ?

ताज्या रँकिंगनुसार, गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 117.4 अब्ज डॉलर इतकी असल्याचे म्हटले जात आहे. यासह झांग यिमिंग 92.8 अब्ज डॉलर संपत्तीसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर मुकेश अंबानी हे 86.9 अब्ज डॉलरसह आशियातील तिसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर जागतिक श्रीमंतांच्या यादीत ते 25 व्या क्रमांकावर पोहचले आहेत.

टॉप 10 मध्ये कोण कोण?

ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार जगातील टॉप-10 श्रीमंतांमध्ये पहिल्या स्थानावर अर्थातच एलॉन मस्क आहेत. 726 अब्ज डॉलरसह ते पहिल्या क्रमांकावर आहेत. तर गुगलचे संस्थापक लॅरी पेज (308 अब्ज डॉलर) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ओरॅकलचे लॅरी एलिसन हे (299 अब्ज डॉलर) तिसऱ्या, सर्गेई ब्रिन (286 अब्ज डॉलर ) चौथ्या तर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस (277 अब्ज डॉलर) पाचव्या क्रमांकवर आहेत. त्यानंतर मायकल डेल(238 अब्ज डॉलर), तर मार्क झुकरबर्ग (213 अब्ज डॉलर), जेंसन हुआंग (184 अब्ज डॉलर), बर्नाड आरनॉल्ट (162 अब्ज डॉलर) आणि स्टीव बालमर (155 अब्ज डॉलर) हे यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत.

Follow Us
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!