AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीच्या आधीच सुरू करा ‘हा’ बिझनेस, महिन्याला कमवाल 30 हजार रुपये; वाचा सविस्तर

होळीआधी प्रत्येकजण आपल्या घरात पापड आणि चिप्स अशा अनेक वस्तू तयार करतो. अशा वेळी तुम्ही पापड व्यवसाय सुरू करू शकता आणि चांगली कमाई करू शकता.

होळीच्या आधीच सुरू करा 'हा' बिझनेस, महिन्याला कमवाल 30 हजार रुपये; वाचा सविस्तर
| Edited By: | Updated on: Mar 10, 2021 | 11:49 AM
Share

नवी दिल्ली : होळीच्या उत्सवात काही दिवस शिल्लक आहेत. तुम्हा सर्वांना माहितच आहे की, होळीआधी प्रत्येकजण आपल्या घरात पापड आणि चिप्स अशा अनेक वस्तू तयार करतो. अशा वेळी तुम्ही पापड व्यवसाय सुरू करू शकता आणि चांगली कमाई करू शकता. होळीच्या काळात तुम्ही या व्यवसायाद्वारे बंपर नफा मिळवू शकता. (business idea earn money with papad making business and get 30000 rupees per month)

या व्यवसायात 10 हजार ते 2 लाख रुपये लावून हा व्यवसाय सुरू करू शकता. पापड बनवण्याचा व्यवसाय (Papad Making Business) फक्त 2 लाख रुपयांमध्ये करता येतो. नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने (National Small Industries Corporation, NSIC) यासाठी एक प्रकल्प अहवाल तयार केला असून या माध्यमातून तुम्हाला मुद्रा योजनेअंतर्गत 4 लाख रुपयांचे कर्ज स्वस्त दराने मिळणार आहे.

एकूण खर्च किती होईल?

या अहवालानुसार, एकूण सहा लाख रुपयांच्या गुंतवणूकीसह सुमारे 30 हजार किलो उत्पादन क्षमता निर्माण होईल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 6.05 लाखांचा खर्च येईल. एकूण खर्चामध्ये निश्चित भांडवल आणि कार्यरत भांडवलाचा समावेश आहे.

किती जागा लागेल?

पापड तयार करण्याच्या व्यवसायासाठी किमान 250 चौरस फूट जागेची आवश्यकता असेल. आपल्याकडे इतकी जागा नसल्यास आपण भाड्यानेही जमीन घेऊ शकता. पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला स्विफ्टर, दोन मिक्सर, प्लॅटफॉर्म बॅलेन्स, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ओव्हन, मार्बल टेबल टॉप, चकला सिलेंडर, अ‍ॅल्युमिनियमची भांडी आणि रॅक यासारख्या यंत्रांची आवश्यकता असेल.

एकदा उत्पादन तयार झाल्यावर ते ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी विकू शकता. ऑफलाइन तुम्ही हे घाऊक विक्रेता आणि किरकोळ व्यापाराला विकू शकता. या व्यतिरिक्त आपण सुपरमार्केट आणि मोठ्या किरकोळ विक्रेत्यांशी संपर्क साधू शकता.

किती असेल नफा ?

अंदाजानुसार, या व्यवसायामध्ये 20 टक्के गुंतवणूक करता येणार आहे. म्हणजेच 1 लाख गुंतवणूकीवर तुम्ही दरमहा सुमारे 20 ते 30 हजार मिळवू शकता. (business idea earn money with papad making business and get 30000 rupees per month)

संबंधित बातम्या – 

Gold price today : ऐन महागाईत सोन्याच्या किंमती घसरल्या, वाचा आजचे ताजे दर

आता 100 रुपये स्वस्त मिळेल गॅस सिलेंडर, फक्त एक छोटसं काम करा आणि पैसे वाचवा

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा काय आहे तुमच्या शहरातले दर

(business idea earn money with papad making business and get 30000 rupees per month)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.