हॉटेल सुरू करून महिन्याला कमवा 1 लाख रुपये, वाचा संपूर्ण प्लॅन…

तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त नफा मिळणार आहे. यामध्ये तुम्ही दरमहा मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता.

हॉटेल सुरू करून महिन्याला कमवा 1 लाख रुपये, वाचा संपूर्ण प्लॅन...

नवी दिल्ली : कोरोनाच्या भीषण काळामध्ये आता प्रत्येकजण व्यवसायाकडे वळत आहे. अशात आम्ही तुम्हाला एक उत्तम बिझनेस आयडिया देणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त नफा मिळणार आहे. यामध्ये तुम्ही दरमहा मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता. या दिवसात ऑनलाईन फूड डिलिव्हरीची मागणी खूपच वेगाने वाढत आहे, अशा परिस्थितीत आपण रेस्टॉरंट उघडून चांगले उत्पन्न मिळवू शकता. कमाईबरोबरच या व्यवसायात वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. (Business idea earn money with restaurant business and get 1 lakh rupees in one month)

एखादे रेस्टॉरंट सुरू करण्यापूर्वी तुम्ही शाकाहारी रेस्टॉरंट किंवा नॉन-व्हेज हॉटेल सुरू करायचे यावर आपण खूप विचार करत असतो. खरंतर, तुम्हाला फक्त फास्ट फूडवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. एक चांगले रेस्टॉरंट उघडण्यासाठी 7-12 लाखांची आवश्यकता आहे. जर जमीन स्वतःची असेल तर त्याची किंमत कमी केली जाऊ शकते.

किती लागेल जागा ?

या व्यवसायातील सर्वाधिक खर्च इमारतीतून होतो, परंतु आपण भाड्याने देऊनसुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी आपल्याला 700 ते 1500 चौरस फूट जागेची आवश्यकता असेल.

परवाना असणे आवश्यक…

या व्यतिरिक्त आपल्याला या व्यवसायासाठी परवाना देखील आवश्यक असेल. सगळ्यात आधी अन्न सुरक्षा परवाना मिळवावा लागेल, जो अन्न विभागाकडून उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला रेस्टॉरंटचे संपूर्ण ब्लू प्रिंट, जमीन अधिकार इत्यादी तयार करुन त्या विभागाला दाखवाव्या लागतील. आरोग्य विभाग व महानगरपालिकेकडून दुसरा आरोग्य परवाना उपलब्ध आहे. जर आपण बार एकत्र उघडला तर आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याचा परवाना घ्यावा लागेल.

मार्केटिंगदेखील एक महत्त्वाचा भाग आहे…

कोणत्याही व्यवसायात यश मिळवण्यासाठी मार्केटिंग महत्त्वाचं आहे. म्हणून जर तुम्ही रेस्टॉरंटच्या आधी आणि नंतर चांगले मार्केटिंग केले तर व्यवसाय चांगला वाढेल. यासाठी आपण माध्यमांमध्ये जाहिराती, सोशल साइटवरील जाहिराती वापरू शकता किंवा पोस्टर व बॅनर वापरू शकता. (Business idea earn money with restaurant business and get 1 lakh rupees in one month)

संबंधित बातम्या – 

Gold Price Today : पुन्हा घसरल्या सोन्याच्या किंमती, आताच चेक करा ताजे दर

1 रुपयाच्या नाण्यावर 10 कोटी कमावण्याची सुवर्णसंधी! पटापट चेक करा संपूर्ण डिटेल्स

फक्त 500 रुपयात पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडा खातं, काही वर्षात मिळेल बक्कळ परतावा

(Business idea earn money with restaurant business and get 1 lakh rupees in one month)

Published On - 1:07 pm, Mon, 5 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI