AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : पुन्हा घसरल्या सोन्याच्या किंमती, आताच चेक करा ताजे दर

एमसीएक्सवरील जून वायदा 0.14 टक्क्यांनी घसरून 45,355 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यापार करत आहेत. त्याचबरोबर चांदी (Silver Price Today) प्रति किलो 65,070 रुपये आहे.

Gold Price Today : पुन्हा घसरल्या सोन्याच्या किंमती, आताच चेक करा ताजे दर
| Edited By: | Updated on: Apr 05, 2021 | 12:25 PM
Share

नवी दिल्ली : जागतिक बाजारात आज सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Price Today) आज खाली आल्या आहेत. म्हणजेच, आज तुम्हाला स्वस्तपणे सोने खरेदी करण्याची संधी आहे. एमसीएक्सवरील जून वायदा 0.14 टक्क्यांनी घसरून 45,355 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यापार करत आहेत. त्याचबरोबर चांदी (Silver Price Today) प्रति किलो 65,070 रुपये आहे. सोने अद्याप विक्रमी पातळीपेक्षा 11000 रुपयांवर कमी व्यापार करीत आहे. (gold prices today down by 11000 from record high and silver rates also fall)

ऑगस्टमध्ये भारतातील सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. ऑगस्टपासून सोन्याच्या किंमतीत सुमारे 11000 रुपयांची घसरण दिसून आली आहे. त्याचबरोबर वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत सोन्या प्रत्येकी 10 ग्रॅम 5 हजारांनी स्वस्त झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास येथेही सोन्याच्या घसरणीसह व्यवसाय सुरू आहे. अमेरिकेतील सोन्याचा व्यापार प्रति औंस 4.04 डॉलरने घसरून 1,724.95 डॉलरवर आला आहे. त्याचबरोबर चांदी 0.09 डॉलर खाली घसरून 24.89 डॉलरवर व्यापार करत आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत

देशाच्या राजधानीत आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 48460 रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईमध्ये 46680 रुपये, मुंबईत 44920 रुपये आणि कोलकातामध्ये प्रति 10 ग्रॅम 47480 रुपये पातळीवर आहे.

वर्षाच्या अखेरीस सोन्याच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता

गुंतवणुकीसाठी सोने नेहमीच चांगला पर्याय ठरला आहे. असे सांगितले जात आहे की, पुन्हा सोन्याच्या किमती गुंतवणूकदारांना चांगले उत्पन्न देऊ शकतात. ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या संशोधन अहवालानुसार, सध्या सोनं चांगली कामगिरी करत आहे. गेल्या वर्षीही सोन्याच्या किमतीनं उच्च विक्रम नोंदविला आहे. परंतु या क्षणी सोने ऑगस्टपासूनच्या विक्रमी उच्चांकडून सुमारे 11 हजार रुपयांनी स्वस्त झालंय. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं.

2021च्या शेवटी सोन्यामध्ये पुन्हा वाढ दिसून येईल. दीर्घ कालावधीत सोने नेहमीच चांगले उत्पन्न देते. 5 मार्च रोजी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 43,887 रुपये होते. त्यानंतर सोन्याची किंमत सुमारे 950 रुपयांनी महाग झाली. तज्ज्ञांच्या मते लग्नाचा हंगाम जसजसा जवळ येऊ लागला, तसतशी मागणी वाढू लागली. काही महिन्यांनंतर सोन्यात अधिक तेजी येऊ शकते. वर्षाअखेरीस सोने 48 हजारांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. (gold prices today down by 11000 from record high and silver rates also fall)

संबंधित बातम्या – 

1 रुपयाच्या नाण्यावर 10 कोटी कमावण्याची सुवर्णसंधी! पटापट चेक करा संपूर्ण डिटेल्स

फक्त 500 रुपयात पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडा खातं, काही वर्षात मिळेल बक्कळ परतावा

RBI ची महत्त्वाची बैठक, कर्जाच्या दरात कपात करण्यावर होईल निर्णय

(gold prices today down by 11000 from record high and silver rates also fall)
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.