मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने एका दिवसात कमवले 790000000 रुपये, कुठून मिळाले हे उत्पन्न

Nara Bhuvaneswari: नारा भुवनेश्वरी या तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि तेलुगू देसम पार्टीचे संस्थापक एन.टी. रामा राव यांची मुलगी आहे. नायडू यांच्या राजकीय प्रवासात त्यांची भेट झाली. दोघांचे सप्टेंबर 1981 मध्ये लग्न झाले.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने एका दिवसात कमवले 790000000 रुपये, कुठून मिळाले हे उत्पन्न
| Updated on: Jul 20, 2025 | 12:39 PM

शेअर बाजारात सध्या घसरण होत आहे. परंतु एका मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने एका दिवसांत 79 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यांचे नाव नारा भुवनेश्वरी आहेत. त्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या पत्नी आहेत. नारा भुवनेश्वरी यांनी ही कमाई शेअर मार्केटमधून केली आहे. शुक्रवारी एका शेअरने त्यांना घशघशीत फायदा मिळवून दिला. हा शेअर चांगलाच वाढला आणि भुवनेश्वरी यांना फायदा मिळवून दिला.

चंद्रबाबू नायडू यांनी सुरु केली होती कंपनी

हेरिटेज फूड्स लिमिटेडच्या शेअरमध्ये शुक्रवारी चांगली वाढ झाली आहे. ही डेअरी कंपनी आहे. त्याची सुरुवात 1992 मध्ये झाली. दक्षिण भारतात ही काफी फेमस आहे. हेरिटेज ग्रुप टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी सुरु केला होता. ही कंपनी डेअरी, रिटेल आणि कृषी क्षेत्रात काम करते. हेरिटेज फूड्स लिमिटेडच्या स्टॉकमध्ये शुक्रवारी प्रचंड वाढ झाली.

शेअरमध्ये एकाच दिवसात सात टक्के वाढ

शुक्रवार शेअर बाजारात घसरण होती. परंतु हेरिटेज फूड्स लिमिटेडच्या शेअरमध्ये सात टक्के वाढ झाली. हा शेअर 493.25 रुपयांपर्यंत गेला. त्यामुळे चंद्रबाबू नायडू यांच्या पत्नीने एका दिवसांत 78,80,11,646 रुपये (जवळपास 79 कोटी रुपये) कमवले. हेरिटेज फूड्सचे शेअर 31 मे 2024 रोजी 402.90 रुपयांवर होते. आता ते 659 रुपयांवर पोहचले आहे. म्हणजेच या काळात शेअरमध्ये 256.10 रुपयांचा फायदा झाला आहे.

हेरिटेज फूड्स लिमिटेड नारा भुवनेश्वरी चालवतात. त्यांच्याकडे या कंपनीचे 2,26,11,525 शेअर आहे. म्हणजे कंपनीत त्यांची 24.37 भागेदारी आहे. सन 2025-26 या वर्षाचे कंपनीचे निकाल आले आहे. त्या निकालाचा सकारात्मक परिणाम हेरिटेज फूड्सच्या शेअरवर दिसला. यामुळे नारा भुवनेश्वरी यांनी एका दिवसात 78,80,11,646 रुपये कमवले.

नारा भुवनेश्वरी एन.टी.रामा राव यांची मुलगी

नारा भुवनेश्वरी या तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) चे संस्थापक एन.टी. रामा राव यांची मुलगी आहे. नायडू यांच्या राजकीय प्रवासात त्यांची भेट झाली. दोघांचे सप्टेंबर 1981 मध्ये लग्न झाले. नारा भुवनेश्वरी हेरिटेज फूड्स लिमिटेडच्या एमडी आहेत.