AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Co-Operative Society Election: मोठी बातमी! सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा ब्रेक, निवडणुकांना आता कधी मुहूर्त?

Cooperative Society Election Postponed: राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीला सध्या तरी मुहूर्त लागण्याची शक्यता नाही. सहकार क्षेत्राअगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गोंधळ संपलेला नाही. त्यामुळे आता सहकार क्षेत्रात निवडणुकीचे पडघम कधी वाजतील?

Co-Operative Society Election: मोठी बातमी! सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा ब्रेक, निवडणुकांना आता कधी मुहूर्त?
सहकारी संस्था निवडणुका पुढे ढकलल्या
| Updated on: Dec 05, 2025 | 2:02 PM
Share

Local Body Election: राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सहकाराच्या आखाड्यातील द्वंद पुन्हा थंडावले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय (Cooperative Society Election Postponed) घेण्यात आला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने याविषयीचे शासकीय परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार पंढरीत आता राजकीय बेलभांडारा उधळल्या जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मात्र वेळेतच होणार आहेत.

अतिवृष्टीमुळे पहिल्यांदा ब्रेक

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने यापूर्वी घेतला होता. राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसानं मोठं थैमान घातलं होतं. अतिवृष्टीमुळे आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील 20 हून अधिक जिल्हे प्रभावित झाले होते. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागला होता. महाराष्ट्र सहकारी संस्था, समितीची निवडणूक, नियम 2014 मधील नियम 4 अंतर्गत अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर ज्या संस्थांच्या निवडणुका घेण्याचे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते. त्या सहकारी संस्थांच्या निवडणुका वगळून हे आदेश देण्यात आले होते.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे खोडा

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचा एक टप्पा पूर्ण झाला असून आता 20 डिसेंबर रोजी दुसरा टप्पा होणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबर रोजी निकाल लागले. तर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका कधी होतील याविषयी राज्य निवडणूक आयोगाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. तोच दाखला देत सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 मधील कलम 73कक मधील तरतुदीनुसार राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका सुरू आहे. तर महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशान्वये ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत, ते वगळून इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर या निवडणुकांना मुहूर्त लागणार आहे.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.