AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिलासा नाहीच! गॅस सिलिंडर पुन्हा महागले; आता मोजावी लागणार इतकी किंमत

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत.

दिलासा नाहीच! गॅस सिलिंडर पुन्हा महागले; आता मोजावी लागणार इतकी किंमत
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 9:13 AM
Share

मुंबई : महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यवसायीकांना महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी वाढल्या आहेत. सर्वसामान्यांच्या दृष्टिने दिलासादायक गोष्ट म्हणजे, घरगुती सिलिडंरचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र व्यवसायिक सिलिंडर 100 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. दरम्यान सिलिंडरचे दर वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिलिंडरच्या नव्या दरानुसार आता दिल्लीमध्ये व्यवसायिक सिलेंडर 2100 रुपयांच्या पुढे गेला आहे.

सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ

गेल्या काही महिन्यांपासून सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज पुन्हा एकदा महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायिक सिलिंडर 100 रुपयांनी महागला आहे. नव्या दरानुसार दिल्लीमध्ये व्यवसायिक सिलिंडरची किंमत 2100 रुपये झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी ती 1733 रुपये इतकी होती. याचाच अर्थ गेल्या साठ दिवसांमध्ये सिलिंडरच्या दरात तब्बल चारशे रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सध्या व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर 2051 रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकातामध्ये 2174.50 रुपये तर चेन्नईमध्ये 19 किलोच्या गॅस सिलिंडरसाठी  2234 रुपये मोजावे लागणार आहेत.

दिलासा नाहीच 

दरम्यान पुढील काळात पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर कमी होतील असा अंदाज वर्तवला जात होता. ज्याप्रमाणे केंद्राने पेट्रोल, आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून, सर्वसामान्यांना दिलासा दिला. तसाच काहीसा निर्णय गॅस सिलिंडरबाबत देखील होऊ शकतो, अशी अपेक्षा होती. मात्र याउलट गॅस सिलिंडरचे दर आज पुन्हा एकदा शंभर रुपयांनी वाढवण्यात आले आहे. याचा मोठा आर्थिक फटका हा व्यवसायिकांना बसणार असून, यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

ट्विटरचे CEO म्हणून ज्यांची जगभर चर्चा, त्या पराग अग्रवाल यांचा नेमका पगार किती? कुठे कुठे काम केलंय?

25 लाखात सुरू केला उद्योग; आज 100 कोटींची उलाढाल, जाणून घ्या ‘मामा अर्थ’ बद्दल

आजपासून बदलनार ‘हे’ सहा नियम, …तर बसू शकतो मोठा आर्थिक फटका

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...