AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या; जाणून घ्या देशात पेट्रोल स्वस्त होणार की महागणार?

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून मंदी असलेल्या कच्च्या तेलाच्या दरांमध्ये अचानक तेजी आल्याचे पहायला मिळाले, आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रती बॅरल 82.72 डॉलरवर पोहोचल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या; जाणून घ्या देशात पेट्रोल स्वस्त होणार की महागणार?
झारखंडमध्ये पेट्रोलचे दर 25 रुपयांनी घटवले
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 11:14 AM
Share

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून मंदी असलेल्या कच्च्या तेलाच्या दरांमध्ये अचानक तेजी आल्याचे पहायला मिळाले, आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रती बॅरल 82.72 डॉलरवर पोहोचल्या आहेत. सर्वसाधारणपणे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये देखील वाढ झाल्याचे पहायला मिळते मात्र भारतातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्या असलेल्या एलओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएलने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असताना देखील पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी  कच्च्या तेलाच्या दरामध्ये घसरण झाली होती, तेव्हा देखील दरामध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. देशात मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचे पहायला मिळत आहे.

प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर 

दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 103.97 इतका आहे, तर डिझेलचा दर प्रति लीटर 86.67 रुपये आहे, मुंबईमध्ये पेट्रोल 109 रुपये तर डिझेल प्रति लिटर 94.14 रुपयांनी विकले जात आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा भाव 101.40 आणि डिझेल 91.43 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये तर डिझेल 89.79 रुपये प्रती लिटर आहे.

सर्वात स्वस्त पेट्रल,डिझेल पंजाबमध्ये 

दरम्यान केंद्राने उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये पंजाबच्या चन्नी सरकारने देखील आपल्या राज्यात पेट्रोलचे, डिझेलचे दर कमी केले. पंजाबमध्ये पेट्रोलचे दर तब्बल 11.27 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 6.9 रुपयांची कपात केली आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, त्या सर्व राज्यांनी काही प्रमाणात पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या 

निर्मला सितारमण साधणार बँकांच्या प्रमुखांशी संवाद; ‘या’ प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा

Sponsored: आदित्य बिर्ला सन लाइफ (ABSL) म्युच्युअल फंडाचे सीआयओ महेश पाटील म्हणतात, बिझनेस सायकल NFO हा एक प्रकारचा ऑल-वेदर फंड आहे, जो सेक्टोरल किंवा थीमॅटिक कल्पनांपेक्षा वेगळा

भारत येत्या मार्चअखेर 400 अब्ज डॉलरची निर्यात करेल; पियुष गोयल यांचा विश्वास

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?