AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधमाशी पालनातून दर महिना कमवा 1 ते 1.5 लाख रुपये

मधमाशी पालनातून दर महिना कमवा 1 ते 1.5 लाख रुपये, प्लांटसाठी सरकारकडून आर्थिक मदत(Earn 1 to 1.5 lac per month from beekeeping)

मधमाशी पालनातून दर महिना कमवा 1 ते 1.5 लाख रुपये
मध उत्पादनात जगातील पाच अग्रेसर देशांमध्ये भारताचा समावेश
| Updated on: Feb 07, 2021 | 9:29 PM
Share

मुंबई : मशमाशी पालन व्यवसाय सध्या मोठ्या प्रमाणात उभारी घेतोय. अनेक राज्यातील शेतकरी पारंपारिक शेती ऐवजी मधमाशी पालनाला प्राधान्य देत आहेत. या व्यवसायासाठी सरकारकडून आर्थिक मदतही उपलब्ध आहे. मधमाशी पालन आणि हनी प्रोसेसिंग युनिटसह प्रोसेसिंग प्लांटच्या मदतीने या व्यवसायात यश मिळू शकते. जर मोठ्या प्रमाणात मधमाशी पालन केले तर काही वर्षातच तुम्ही लखपती बनू शकता. व्यवसायात यश मिळवण्याकरीता कामाप्रती समर्पित आणि धैर्य असले पाहिजे. मधमाशी पालनाला चालना देण्यासाठी सरकारने या उद्योगासाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्यात. यामध्ये प्रमुख सुविधा आहे उद्योग कर्ज. या उद्योगासाठी सरकारकडून 2 ते 5 लाखांचे कर्ज उपलब्ध आहे. हा उद्योग लघुउद्योग श्रेणीमध्ये येत असल्याने सरकार याकडे अधिक लक्ष केंद्रित करीत आहे. (Earn 1 to 1.5 lac per month from beekeeping)

कशी कराल कमाई?

तुम्ही 10 बॉक्स घेऊनही मधमाशी पालन करु शकता. जर प्रत्येक बॉक्समधून 40 किलो मध मिळाले तर 10 बॉक्समधून एकूण 400 किलो मध मिळते. प्रतिकिलो 350 रुपये दराने 400 किलो मध विक्री केल्यास 1 लाख 40 हजार रुपये कमाई होते. प्रत्येक बॉक्सचा खर्च 3500 हजार रुपये येतो. याप्रमाणे 10 बॉक्सचा एकूण खर्च 35 हजार रुपये होतो. म्हणजे यातून तुम्हाला 1,05,000 रुपये फायदा होतो. दर वर्षी मधमाशांची संख्येत वाढ झाली की हा व्यवसाय 3 पटीने वाढतो. अर्थात 10 पेटीपासून सुरु झालेला व्यवसाय एका वर्षात 25 ते 30 पेटी होऊ शकतो.(Earn 1 to 1.5 lac per month from beekeeping)

मधमाशी पालनाचे अर्थशास्त्र त्याच्या दर्जावर अवलंबून असते. प्रत्येक डब्यातून प्राप्त होणारे 50 किलो कच्चे मध 100 रुपये प्रति किलोच्या दराने विकले जाते. म्हणजेच प्रत्येक डब्यामागे तुम्हाला 5 हजार रुपये मिळकत होते. मोठ्या प्रमाणात उद्योग केल्यास प्रति महिना 1 लाख 15 हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. जैविक मध चांगल्या किंमतीत बाजारात विकले जाते. एक किलो ऑर्गेनिक मधाचा दर 400 ते 700 रुपये असतो. हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करायचा असल्यास प्रति वर्षी 20 हजार किलो मध बनविण्यासाठी एकूण खर्च 24 लाख 50 रुपये येतो.

सरकारकडून आर्थिक मदत उपलब्ध

हा व्यवसाय सुरु करायचा असल्यास सरकारकडून हनी प्रोसेसिंग प्लान्टसाठी आर्थिक मदत मिळते. उद्योगासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 65 टक्के हिस्सा सरकारकडून कर्जाच्या स्वरुपात मिळतो. यासोबतच सरकारकडून 25 टक्के सबसिडीही मिळते. अशा प्रकारे व्यावसायिकाला केवळ 10 टक्के रक्कम गुंतवावी लागते. समजा, एकूण खर्च 24 लाख 50 हजार रुपये येत असेल तर 16 लाख रुपयाचे कर्ज मिळते. त्यानंतर सबसिडी 6 लाख रुपये मिळते. म्हणजे केवळ 2 लाख रुपये व्यावसायिकाला गुंतवणूक करायची आहे.(Earn 1 to 1.5 lac per month from beekeeping)

इतर बातम्या

भारताच्या चहाची बदनामी करण्यासाठी परदेशातून षडयंत्र रचलं जातंय : पंतप्रधान मोदी

बायकोचे नातेवाईकासोबत प्रेमसंबंध, नवऱ्याने आक्षेपार्ह स्थितीत पकडले आणि…

(Earn 1 to 1.5 lac per month from beekeeping)

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.