बायकोचे नातेवाईकासोबत प्रेमसंबंध, नवऱ्याने आक्षेपार्ह स्थितीत पकडले आणि…

सफाळयात अनैतिक संबंधातून दुहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Husband killed Wife And Her Boyfriend In Palghar) 

बायकोचे नातेवाईकासोबत प्रेमसंबंध, नवऱ्याने आक्षेपार्ह स्थितीत पकडले आणि...
Crime-News

पालघर : सफाळयात अनैतिक संबंधातून दुहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत नवऱ्याने बायकोला आणि तिच्या प्रियकराची जागीच हत्या केली आहे. सफाळे कपासे या ठिकाणी ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी नवऱ्याला अटक करण्यात आली आहे. (Husband killed Wife And Her Boyfriend In Palghar)

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर तालुक्यातील सफाळे कपासे ठाकूरपाडा या ठिकाणी दिलीप तानाजी ठाकरे हे राहतात. यावेळी दिलीप यांनी राहत्या घरी पत्नी आणि तिच्या प्रियकराला दोघांनाही  पकडले. यानंतर नवऱ्याने रागाच्या भरात पत्नीसह प्रियकराच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घातला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

नेमकं प्रकरणं काय?

संगिता दिलीप ठाकरे आणि पांडू बाळकृष्ण श्रावण असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहे. पांडू बाळकृष्ण श्रावणे हा दहिसरमधील मनोर गावातील रहिवाशी आहे. त्याचे संगिता दिलीप ठाकरे या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. आरोपी दिलीप आणि मृत पांडू हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

दिलीप ठाकरे घरी नसताना संगिता आणि पांडू एकमेकांच्या घरी येतं. आज अशाचप्रकारे दिलीप घरी नसताना पांडू घरी आला. काही वेळानंतर दिलीप यांनी संगिता आणि पांडू या दोघांना आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडले. यानंतर दिलीप यांना राग अनावर झाला. त्यांनी रागाच्या भरात घरात असलेल्या कुऱ्हाडीचा दांड्याने दोघांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले.

आरोपी दिलीप ठाकरे याला सफाळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मृत संगिता आणि पांडू या दोघांनाही शवविच्छेदनासाठी माहिम येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करीत आहे. (Husband killed Wife And Her Boyfriend In Palghar)

संबंधित बातम्या : 

मुंबईतील फुटपाथवर पेट्रोल डिझेलची अवैध विक्री, पोलिसांकडून पर्दाफाश

तिनं आधी पोर गमावलं, नंतर नवऱ्याचा दंडुक्याचा मार, नंतर जीव, बीडचा खून आरसा दाखवणारा

Published On - 9:05 pm, Sun, 7 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI