तिनं आधी पोर गमावलं, नंतर नवऱ्याचा दंडुक्याचा मार, नंतर जीव, बीडचा खून आरसा दाखवणारा

महाराष्ट्राच्या समाजमनाला आरसा दाखवणारी बातमी बीडमध्ये घडली आहे. नवऱ्यानं एका महिलेला हातपाय बांधून दंडुक्यानं मारलं आणि त्यातच तिचा जीव गेला.

तिनं आधी पोर गमावलं, नंतर नवऱ्याचा दंडुक्याचा मार, नंतर जीव, बीडचा खून आरसा दाखवणारा

बीड : महाराष्ट्राच्या समाजमनाला आरसा दाखवणारी बातमी बीडमध्ये घडली आहे. नवऱ्यानं एका महिलेला हातपाय बांधून दंडुक्यानं मारलं आणि त्यातच तिचा जीव गेला. कारण वंशाचा दिवा. ‘बेटी बचाव’चा सरकारी नारा ह्या घटनेपासून किती दूर कोसो दूर राहीला हे सिद्ध होतं आहे.

नेमकं काय घडलं?बीड तालुक्यात गाव आहे औरंगपुर. याच गावात मनोहर रेटे आणि राधा रेटे हे जोडपं रहात होतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लेकरं होती. दोन मुलानंतर राधाबाईनं कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करुन घेतली. पण अचानक एकुलत्या एक अशा पोराचा काही काळापुर्वी अपघाती मृत्यू झाला. घरात फक्त मुलगीच राहीली. पण मुलीला मनोहर रेटे वंशाचा दिवा मानत नसावेत. त्यांनी मुलगा पाहिजे म्हणून राधाबाईकडे हट्ट सुरु केला. पण ऑपरेशन केलेलं असल्यामुळे आता मुल होणार कसं? मग मनोहर रेटेंनी राधाबाईकडे दुसरं लग्न करतो म्हणून तगादा लावला. त्यातून दोघांचे खटके उडायला लागले. मनोहर मारझोड करायला लागला.  (Husband kills wife in Beed)

30 हजाराचा खर्च न परवडणारा नवऱ्याची वंशाची इच्छा पूर्ण करायची म्हणून राधाबाईनं डॉक्टर्सकडे पुन्हा तपासणी केली. पुन्हा मुल होण्यासाठी ऑपरेशन करायची तयारी दर्शवली. डॉक्टरांनी त्यासाठी 30 हजार रुपये खर्च येतील असं सांगितलं. मनोहर हा सालगडी म्हणून काम करायचा. एवढे पैसे आणायचे कुठून म्हणून त्यानं पुन्हा भांडण केलं. त्यापेक्षा त्याला दुसरी बायको करणं सोप्पं वाटू लागलं. त्यानं ऑपरेशनपेक्षा दुसऱ्या लग्नाचा तगादा लावला. त्याला राधाबाईनं विरोध केला.

अन् राधाबाईचा अर्ध्या रस्त्यात जीव गेलासालगडी म्हणून मनोहर रेटे आणि राधाबाई शेतात रहात होते. दहा वर्षापुर्वी त्यांचं लग्न झालं होतं.आसपास शेतात कुणाचा शेजार नव्हता. दोन दिवसांपुर्वी मनोहरनं पहाटेलाच राधाबाईचे हातपाय बांधले आणि दांडक्यानं मारहाण केली. राधाबाई ओरडत राहील्या पण कुणी सोडवायला येणं शक्य नव्हतं. मारहाण करुन मनोहर निघून गेला. सकाळपर्यंत राधाबाई तशाच विव्हळत राहील्या. नंतर ऊन वर आल्यानंतर शेतात शेजारी आले. त्यांनी राधाबाईची सुटका केली. जखमी राधाबाईला दवाखाण्यात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

मनोहर रेटेला अटकही घटना कळताच राधाबाईच्या माहेरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रितसर खुनाचा गुन्हा दाखल केला. मनोहर रेटेला अटक करण्यात आलीय. कोर्टानं त्याला 8 फेब्रुवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित बातम्या : 

म्हशीवर करणी केल्याचा समज, बीडमध्ये चिमुकल्याची हत्या, भावकीतील दाम्पत्य अटकेत

पोलिसांनो, निधर्मी भावनेने कारवाई करा – हायकोर्ट

आधी बाळाचं मस्तक धडा वेगळं केलं नंतर ती वाशीच्या खाडीवर पोहोचली, पुढं जे घडलं त्यानं हादरवलं

(Husband kills wife in Beed)

Published On - 10:07 am, Sun, 7 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI