आधी बाळाचं मस्तक धडा वेगळं केलं नंतर ती वाशीच्या खाडीवर पोहोचली, पुढं जे घडलं त्यानं हादरवलं

चेंबूर येथे राहणाऱ्या 30 वर्षीय विवाहितेने आपल्या 1 वर्षाच्या बाळाचं मस्तक धडा वेगळे करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

आधी बाळाचं मस्तक धडा वेगळं केलं नंतर ती वाशीच्या खाडीवर पोहोचली, पुढं जे घडलं त्यानं हादरवलं


नवी मुंबई : चेंबूर येथे राहणाऱ्या 30 वर्षीय विवाहितेने आपल्या 1 वर्षाच्या बाळाचं मस्तक धडा वेगळे करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आरोपी महिलेने आपल्या बाळाची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे बॅगमध्ये टाकले आणि बॅगसह धावत्या रेल्वेमधून उडी मारून आत्महत्या केली. वाशी खाडीपूल येथे गुरुवार (4 फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली. आरोपी महिलेने बाळाचा गळा चिरून त्याची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेवर गुन्हा दाखल केलाय (Mother murder own child and then Suicide in Vashi Railway Station).

आरोपी महिलेने मानसिक संतुलन बिघडल्यामुळे हा प्रकार केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती वाशी जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत. पुढील तपासासाठी पोलिसांनी 2 पथकं तयार केली आहेत. ज्या निघृणपणे बाळाचा गळा चिरून दोन तुकडे करण्यात आले. याबाबत पोलीस बारकाईने तपास करत असून एक पथक हडपसर, पुणे येथे रवाना झाले आहे, तर दुसरे पथक मुंबईत तपास करत आहे.

आरोपी महिलेचा चेंबूर येथील सिव्हील इंजिनियर व्यक्तीशी विवाह झाला होता. तेव्हापासून ती पती व कुटुंबियासह चेंबूर येथे राहत होती. आज (6 फेब्रुवारी) वर्षभरापूर्वी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. परंतू त्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्याआधीच तिने त्याला संपवून स्वतः जगाचा निरोप घेतला. गेल्या दीड दोन वर्षांपासून महिला तिच्या माहेरी हडपसर, पुणे येथे राहत होती. बाळाच्या वाढदिवसाचे साहित्य आणण्यासाठी विवाहितेची आई घराबाहेर गेली होती. त्यावेळी कोणालाही न सांगता ही महिला मुलाला घेऊन मुंबईला निघाली होती.

रात्री 10 वाजताची पनवेलहून मुंबई लोकल पकडून वाशी खाडीपूल येताच महिलेने उडी मारली. शिवाय महिला मनोरुग्ण असल्याचंही सांगण्यात येत आहे. परंतू मनोरुग्ण असलेली महिला मुलाचा गळा कापून त्याला बॅगमध्ये टाकून पुण्याहून एवढ्या दूर वाशीला येऊन आत्महत्या का करेल? असाही प्रश्न निर्माण झालाय. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

हेही वाचा :

 ‘निर्देशांचं पालन करा, अन्यथा कारवाई’, अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ

अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवची आत्महत्या, चाहत्यांना मोठा धक्का

मुंबईतील अभियंत्यावर बलात्काराचा आरोप, 47 वर्षीय महिला पोलिसाची पुण्यात आत्महत्या

व्हिडीओ पाहा :

Mother murder own child and then Suicide in Vashi Railway Station

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI