Arnab Goswami : ‘निर्देशांचं पालन करा, अन्यथा कारवाई’, अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ झालीय.

  • मेहबूब जमादार, टीव्ही 9 मराठी, रायगड
  • Published On - 16:28 PM, 6 Feb 2021
Arnab Goswami : 'निर्देशांचं पालन करा, अन्यथा कारवाई', अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ

रायगड : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ झालीय. अलिबाग न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना अर्णबसह दोघांना 10 मार्चच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत अलिबाग कोर्टाने आरोपींच्या वकिलांना सक्त ताकिद दिलीय. त्यामुळे अर्नब गोस्वामींना स्वतः न्यायालयात हजर होण्याची नामुष्की येणार आहे (Alibaug Court warn Journalist Arnab Goswami in Anvay Naik Suicide Case hearing).

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीत आजही (6 फेब्रुवारी) तिन्ही आरोपी गैरहजर होते. त्यामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेत 10 मार्चला होणाऱ्या पुढील सुनावणीला या तिन्ही आरोपींना हजर राहण्याचे निर्देश दिले. तसेच हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा दिलाय.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी त्यांची आई कुमुद नाईक (84) यांचाही मृतदेह आढळून आला होता. तसेच त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.

अन्वय नाईक हे इंटिरिअर डिझाईनर होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय यांच्या कॉनकॉर्ड कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते.

हे काम पूर्ण झाल्यानतंरही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव गोस्वामींसह इतरांना विनंती केली होती. मात्र अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होते.

दुसरीकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिकांकडून या कामासाठी माल घेतला होता, त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता. पण कामाचे पैसे न मिळाल्याने अन्वय यांना नैराश्य आलं होतं. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.

अन्वय यांनी त्यांच्या आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावं लिहिली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

रायगड पोलिसांसाठी अन्वय यांच्या कॉनकॉर्ड डिझायनर कंपनीच्या विविध कार्यालयांची तपासणी केली होती. तसेच ही हायप्रोफाईल केस असल्याने तपासासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष तपास पथक तयार केले. सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आर्थिक व्यवहारांची खातरजमा करण्यासाठी हे तपास पथक अन्वय यांच्या मुंबईतील कार्यालयाची तपासणी केली. (Mumbai Interior designer Anvay Naik Suicide Case Information)

हेही वाचा : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बेनामी मालमत्तेची माहिती लपवली, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव; सोमय्यांचा आरोप

Anvay Naik Suicide | अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णव गोस्वामींसह 2 जणांविरोधात गंभीर आरोप

व्हिडीओ पाहा :

Alibaug Court warn Journalist Arnab Goswami in Anvay Naik Suicide Case hearing