मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव; सोमय्यांचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत व्यक्तीची संपत्ती स्वत:च्या नावे करण्यासाठी ग्रामपंचायतीवर दबाव आणला होता. ही मृत व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अन्वय नाईक आहेत, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. (Kirit Somaiya allegations on Uddhav Thackeray)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:14 PM, 7 Jan 2021
मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव; सोमय्यांचा आरोप
Kirit Somaiya

रायगड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत व्यक्तीची संपत्ती स्वत:च्या नावे करण्यासाठी ग्रामपंचायतीवर दबाव आणला होता. ही मृत व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अन्वय नाईक आहेत, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या जमीन खरेदीचे सर्व व्यवहार कोर्टात उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Kirit Somaiya allegations on Uddhav Thackeray)

किरीट सोमय्या यांनी आज रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात जाऊन ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी हा आरोप केला. मृत अन्वय नाईक यांच्या मालकीच्या 19 मालमत्ता 5 कोटी 29 लाख किंमतीच्या मालमत्ता ग्रामपंचायतीने ठाकरे कुटुंबाच्या नावे कशा प्रकारे केल्या हे पाहून मान शरमेने खाली जाते. 2014मध्ये अन्वय नाईक यांच्याकडून ठाकरे परिवाने करार केला होता. नाईक यांच्या मृत्यूनंतर ठाकरे परिवाराने ही जमीन स्वत:च्या नावे करून घेतली. हे सर्व व्यवहार आम्ही कोर्टात उघड करू, असं सोमय्या यांनी सांगितलं.

ग्रामपंचायतीचा खुलासा

सोमय्या यांच्या आरोपावर कोर्लई ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी खुलासा केला आहे. 2014मध्ये रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नऊ एकर जमीन खरेदी केली होती. नाईक यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस अज्ञा नाईक आणि वर्षा नाईक यांनी 2018मध्ये एक पत्रं सादर करून ही जमीन विकण्यास हरकत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावावर ही जमीन करण्यात आली, असं मिसाळ यांनी सांगितलं.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी त्यांची आई कुमुद नाईक (84) यांचाही मृतदेह आढळून आला होता. तसेच त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.

अन्वय नाईक हे इंटिरिअर डिझाईनर होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय यांच्या कॉनकॉर्ड कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते. (Kirit Somaiya allegations on Uddhav Thackeray)

हे काम पूर्ण झाल्यानतंरही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव गोस्वामींसह इतरांना विनंती केली होती. मात्र अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. (Kirit Somaiya allegations on Uddhav Thackeray)

 

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाची चौकशी थांबवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणार

अन्वय नाईकप्रकरण आधीच्या सरकारने दाबलं; जयंत पाटलांचा आरोप

अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी क्लोज करणाऱ्यांची चौकशी व्हावी: अरविंद सावंत

अन्वय नाईकांची आत्महत्या पटत नाही, पैशाचं कारण न पटणारं : निलेश राणे

(Kirit Somaiya allegations on Uddhav Thackeray)