AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन्वय नाईकांची आत्महत्या पटत नाही, पैशाचं कारण न पटणारं : निलेश राणे

कारवाई कशी होईल किंवा तपास कसा होईल हे आम्ही बघू, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली. (BJP Leader Nilesh Rane On Interior designer Anvay Naik Suicide Case) 

अन्वय नाईकांची आत्महत्या पटत नाही, पैशाचं कारण न पटणारं : निलेश राणे
| Updated on: Nov 05, 2020 | 2:43 PM
Share

मुंबई : “मुंबईतील प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांनी आत्महत्या का केली?, याचं सत्य नक्की बाहेर पडेल,” अशी प्रतिक्रिया भाजप नेते निलेश राणे यांनी दिली आहे. “तब्बल 300 कोटींचा मालक 5 ते 6 कोटींसाठी आईबरोबर आत्महत्या करतो, हे मला पटत नाही, यात काही वेगळंही कारण असू शकतं आणि त्याची उत्तरं महाराष्ट्राला मिळायला हवीत,” असेही निलेश राणे म्हणाले. ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (BJP Leader Nilesh Rane On Interior designer Anvay Naik Suicide Case)

“अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत नव्हतं. म्हणून अलिबागमध्ये स्थानिकांकडून माहिती काढल्यानंतर असं कळलं की त्यांची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली त्याचं कारण पैसे होऊ शकत नाही, ती आत्महत्या नाही, असं अलिबागमधील काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे सत्य बाहेर पडेलंच,” असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. यावरुन त्यांनी महाविकासआघाडीच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे.

निलेश राणे काय म्हणाले?

“मला ही आत्महत्या आहे हे पटत नव्हतं. कारण एका व्यक्तीने आणि त्यांच्या आईने एकत्र चार किंवा सहा कोटींसाठी आत्महत्या का केली असावी? असा प्रश्न मला पडत होता. कारण ३०० कोटींची मालमत्ता ज्यांच्याकडे आहे. ती व्यक्ती चार पाच कोटींसाठी का आत्महत्या करेल हे मला पटत नव्हते. म्हणून अलिबागमधील स्थानिकांना संपर्क साधून याची चौकशी केली.”

“त्या ठिकाणी राहणाऱ्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार, याबाबत पैशाचं काही कारण नसावं. यात काही वेगळंही कारण असू शकतं. त्यात आता कारवाई कशी होईल किंवा तपास कसा होईल हे आम्ही बघू.

पण ३०० कोटींचा मालक ५ ते ६ कोटींसाठी आईबरोबर का आत्महत्या करतो, असा प्रश्न आहे. ती उत्तर महाराष्ट्राला मिळायला हवीत. हे माझं म्हणणं नाही, त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिकांचं आहे, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली.

हेही वाचा – Arnab Goswami | अर्णव गोस्वामी प्रकरण : न्यायालयात नेमकं काय घडलं?

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी काल अर्णव गोस्वामीला अटक केल्यानंतर त्याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णव गोस्वामी यांना काल सकाळी मुंबई आणि रायगड पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली. यानंतर अर्णव गोस्वामी यांना अलिबागमधील न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हापासून अर्णव यांच्या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. यादरम्यान अर्णव गोस्वामी यांना रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. (BJP Leader Nilesh Rane On Interior designer Anvay Naik Suicide Case)

संबंधित बातम्या :

Anvay Naik Suicide Case | प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?

अर्णव प्रकरणी दिल्लीतील सत्य मांडलं तर पळता भुई थोडी होईल; संजय राऊत यांचा इशारा

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.