बीड जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक : पंकजा मुंडे परदेशात, प्रीतम मुंडेंवर जबाबदारी

राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीसाठी (Beed ZP president election) आज मतदान होत आहे.

बीड जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक : पंकजा मुंडे परदेशात, प्रीतम मुंडेंवर जबाबदारी
Follow us
| Updated on: Jan 04, 2020 | 11:01 AM

बीड : राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीसाठी (Beed ZP president election) आज मतदान होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज फक्त मतदान पार पडणार आहे. हायकोर्टाच्या आदेशामुळे निकाल 13  जानेवारीपर्यंत राखीव ठेवण्यात येणार आहे. (Beed ZP president election)

राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत काल औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. बीडमध्येही महाविकास आघाडी होणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

दुसरीकडे भाजपच्या नाराज नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या सध्या परदेशात आहे. त्यांनी जिल्हा परिषदेची जबाबदारी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडे सोपवली आहे. तर शिवसंग्राम संघटनेच्या विनायक मेंटेंनी आपल्या सदस्यांना व्हीप बजावला

पंकजा मुंडे परदेशात

बीड जिल्हा परिषद निवडणुकीत काट्याची टक्कर होत असताना, बीडच्या नेत्या पंकजा मुंडे परदेशात असल्याने त्यांची नाराजी अद्याप दूर झाली नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेसारख्या महत्वाच्या निवडणुकीतही पंकजा मुंडे नाहीत.  नेमकं याचवेळी परदेश दौऱ्याने मतदारसंघात कुजबूज सुरु आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहेतच, शिवाय सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची औरंगाबाद येथे शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्या शिवकन्या सिरसाठ यांचे नाव अध्यक्षपदासाठी तर नागरगावचे जिल्हा परिषद सदस्य जयसिंह सोळंके यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. जयसिंह सोळंके हे आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे आहेत.

बीड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल –

  • राष्ट्रवादी काँग्रेस – १९
  • काँग्रेस – ३
  • भाजपा – १९
  • शिवसेना – ४
  • काकू – नाना आघाडी – २
  • अपक्ष – २
  • शिवसंग्राम – ४ ( मात्र सर्व सदस्य भाजपवासी झालेत)

संबंधित बातम्या  

बीड झेडपीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठरले

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.