AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk ने इतिहास रचला; जगातील पहिले ट्रिलिनिअर! एकाच दिवसात कमावले 45 अब्ज डॉलर

Elon Musk Trillionaire : एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला. मोजदाद करता येणार नाही इतकी संपत्ती मस्क यांनी कमावली आहे. त्याच्या संपत्तीत प्रत्येक दिवशी मोठी भर पडत आहे. त्याने एकाच दिवसात 45 अब्ज डॉलर कमावले.

Elon Musk ने इतिहास रचला; जगातील पहिले ट्रिलिनिअर! एकाच दिवसात कमावले 45 अब्ज डॉलर
एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंतImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 22, 2026 | 1:19 PM
Share

Elon Musk Networth: जागतील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क याने अजून एक इतिहास रचला आहे. त्याच्या संपत्तीत दिवसागणिक मोठी वाढ होत असतानाच आता त्याने संपत्तीत नवीन विक्रम केला आहे. गुरुवारी त्याच्या संपत्तीत एकाच दिवशी जवळपास 45 अब्ज डॉलर $45,000,000,000 म्हणजे 4,32,680 कोटी रुपयांची भर पडली. त्यामुळे त्याची एकूण संपत्ती 722 अब्ज डॉलरच्या घरात पोहचली आहे. मस्क आता जगातील पहिला ट्रिलिनयन झाल्याचे मानले जात आहे. तो ट्रिलिनिअर क्लबमधील एकमेव सदस्य ठरला आहे.

मस्क यांच्या संपत्तीत रेकॉर्डब्रेक वाढ

एलॉन मस्क याच्या संपत्तीत रेकॉर्डब्रेक वाढ झाल्याची नोंद ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सने दिली आहे. एलॉन मस्क याच्या संपत्तीत यंदा आतापर्यंतची सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे. त्याच्या तुलनेत इतर अब्जाधीश कित्येक मैल दूर आहेत. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सननुसार, श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर लॅरी पेज आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही मस्क याच्या अर्धी आहे. म्हणजे मस्कपर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी त्यांना संपत्तीत दुप्पट वाढ करावी लागणार आहे.

स्पेसएक्स IPO मुळे संपत्तीत मोठी भर

एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स लवकरच अमेरिकेत IPO आणण्याची तयारी सुरू केली आहे. गुंतवणूकदार स्पेसएक्स कंपनीत गुंतवणूक वाढवत आहेत. स्पेसएक्स रॉकेट आणि सॅटेलाईच इंटरनेट सेवा स्टारलिंक यासाठी ओळखली जाते. स्पेसएक्सचा IPO वॉल स्ट्रीटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आयपीओपैकी एक असेल. स्पेसएक्स सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. तिचा कोड SPCX असा असेल. यामुळे एलॉन मस्क यांच्या संपत्तीत अजून मोठी उसळी येण्याची शक्यता आहे.

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी किती पिछाडीवर

यंदा एलॉन मस्क याच्या संपत्तीत 103 अब्ज डॉलर इतकी मोठी भर पडली आहे. भारतातील दोन मोठे उद्योजक आणि श्रीमंत व्यक्ती यांच्यापेक्षा मस्क यांची संपत्ती कित्येक पट अधिक आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही जवळपास 88.10 अब्ज डॉलर इतकी आहे. तर गौतम अदानी यांची नेटवर्थ जवळपास 108 अब्ज डॉलर इतकी आहे.

जगातील अब्जाधीश

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलॉन मस्क हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्यानंतर लैरी पेज हे 58.1 अब्ज डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्गी ब्रिन यांची संपत्ती 53.7 अब्ज डॉलर इतकी आहे. याशिवाय डेविड सुन, झान तू, माइकल डेल, जेफ बेजोस, जेनसेन हुआंग आणि इतर अनेक अब्जाधीशांच्या संपत्तीत काही ना काही भर पडली आहे.

Follow Us
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...