ATM आणि UPI मधून कसा काढणार PF चा पैसा; या जूनपासून खरंच सुरू होणार सेवा?

EPFO ATM UPI PF Withdrawal : EPFO ने नवीन प्लॅटफॉर्म ईपीएफओ 3.0 लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. जून 2025 पासून EPF सदस्य UPI आणि ATM च्या सहाय्याने लागलीच PF रक्कम काढू शकतील. यापूर्वी ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ होती.

ATM आणि UPI मधून कसा काढणार PF चा पैसा; या जूनपासून खरंच सुरू होणार सेवा?
Image Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: May 30, 2025 | 2:09 PM

केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) आधुनिक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ईपीएफओ 3.0 लाँच करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. EPFO 3.0 नावाने नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. जून 2025 पासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून PF सदस्याला भविष्य निधी खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सोपी होईल. ती अधिक गतिमान होईल.

आता PF रक्कम काढणे अधिक सोपे

EPFO 3.0 अंतर्गत आता कर्मचारी UPI आणि ATM च्या मदतीने त्यांचा PF पैसा काढू शकतील. यापूर्वी या पीएफ रक्कम काढण्यासाठी दीर्घ प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. त्यांना अर्ज भरावा लागत होता. त्या अर्जाला मंजूरीसाठी वाट पाहावी लागत होती. आता ही जूनी प्रक्रिया इतिहास होणार आहे. नवीन पद्धतीमुळे जास्तीत जास्त दावे हे स्वयंचलित प्रक्रियेने पूर्ण होतील. आता अवघ्या तीन दिवसात पीएफ रक्कम काढता येईल. क्लेमचा निपटारा होणार.

EPFO 3.0 मध्ये मोठे बदल

ATM आणि UPI मधून काढा रक्कम : PF खात्यातून रक्कम काढण्यासाठी आता युपीआय आणि एटीएमचा वापर करता येईल.

ऑनलाईन बॅलन्स चेक, फंड हस्तांतरण : सदस्य त्यांच्या PF बॅलन्सची माहिती ऑनलाईन पाहू शकतील. ते ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करू शकतील.

डिजिटल KYC अपडेट : मोबाइल OTP व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून खाते अपडेट करता येईल.

सुरक्षेवर विशेष लक्ष : सर्व व्यवहार आणि अपडेट्स सदस्यांना सुरक्षितपणे उपलब्ध होतील.

ATM मधून पैसे कसे काढणार?

EPFO एटीएम विड्रॉल कार्ड देईल. हे कार्ड त्यांच्या PF खात्याशी लिंक असेल.

ऑनलाईन क्लेम करा (90% क्लेम आता स्वयंचलित) असतील.

क्लेम सेटलमेंटनंतर आता ATM मधून विड्रॉल कार्डच्या माध्यमातून पैसे काढता येतील

सदस्यांना त्यांच्या एकूण रक्कमेच्या 50% ते 90% पर्यंत पैसे काढता येईल.

PF काढण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या

UAN (Universal Account Number) सक्रिय असणे आवश्यक आहे

मोबाईल क्रमांक, आधार, पॅन आणि बँक खाते—सर्व UAN सोबत लिंक असावी

ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, कॅन्सल धनादेश (यामध्ये IFSC आणि खाते क्रमांक) आणि UPI/ATM इंटीग्रेशन गरजेचे आहे.