Success Story : फक्त 100 गायी अन् उभा केला 83 कोटींचा ब्रँड! दुधाचा व्यवसाय अडचणीत आला म्हणून जोडप्याने शोधली नवी वाट
एकेकाळी दुधव्यवसायात अडचणींचा सामना करणाऱ्या या जोडप्याने आज मिठाई आणि फरसाणाचा मोठा व्यवसाय उभा केला आहे. त्यांच्या इंडिया स्वीट हाऊस या ब्रँडची वार्षिक उलाढाल आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 83.10 कोटी रूपये झाली आहे.

व्यवसाय केला की प्रत्येक वेळी यश मिळेलच असं नाही. कधी परिस्थिती साथ देत नाही. तर कधी व्यवसायाचं गणित बिघडतं. मात्र अशा वेळी योग्य निर्णय घेतला तर अडचणींमधूनही मोठी संधी निर्माण होऊ शकते आणि एका जोडप्याने हे करून दाखवलं. एकेकाळी दुधव्यवसायात अडचणींचा सामना करणाऱ्या या जोडप्याने आज मिठाई आणि फरसाणाचा मोठा व्यवसाय उभा केला आहे. त्यांच्या इंडिया स्वीट हाऊस या ब्रँडची वार्षिक उलाढाल आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 83.10 कोटी रूपये झाली आहे.
100 गायी आणि 20 एकर शेतीतून व्यवसायाला सुरूवात छ श्वेता आणि विश्वानाथ यांनी 2015-16 च्या सुमारास सेंद्रिय शेती आणि दुग्धव्यवसाय सुरू केला. त्यांनी 20 एकरांवर शेती उभी केली आणि जवळपास 100 गायींचं संगोपन केलं. कर्मा फार्म्स या नावाने ते दुध, पनीर आणि तूप विकत होते, शेतातील ताज्या दुग्धजन्य पदार्थांच्या माध्यमातून टिकाऊ व्यवसाया उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
कोरोनामुळे व्यवसायासमोर संकट
मात्र कोरोना महामारीमुळे त्यांच्या व्यवसायाचं गणित बिघडलं. ताज्या दुधाची मागणी आणि पुरवठा सांभाळण कठीण झालं. निर्बंध आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे ग्राहकांपर्यंत थेट उत्पादने पोहोचवण्यासाठी समस्या निर्माण झाल्या. त्यात काचेच्या बाटल्या ग्राहकांकडून परत गोळा करणे आव्हानच होतंय. या परिस्थितीत व्यवसाय बंद करण्याऐवजी त्यांनी उपलब्ध दुधाचा दुसऱ्या पद्धतीने वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यातून पारंपरिक भारतीय मिठाई बनवण्याचे प्रयोग सुरू झाले.
2020 मध्ये इंडिया स्वीट हाऊसची सुरूवात
या प्रयोगातून 2020 मध्ये इंडिया स्वीट हाऊस या ब्रँडचा जन्म झाला. सुरूवातीला त्यांनी ऑनलाईन माध्यमातून मिठाई विकण्यावर भर दिला. बिगबास्केट, मेट्रो कॅश अँड कॅरी आणि स्पार इंडिया यांसारख्य़ा माध्यमांवरून त्यांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचू लागली. त्यामुळे ग्राहकांना कोणत्या प्रकारच्या मिठाई आवडतात. याचा अंदाज घेण्यास त्यांना मदत झाली. यानंतर जुलै 2011 मध्ये बंगळूरूमधील मल्लेश्वरम येथे त्यांनी पहिलं दुकान सुरू केलं.
50 हून अधिक दुकान आणि 83 कोटींची उलाढाल
हळूहळू त्यांच्या उत्पादनांमध्ये मुरूक्कू, चिप्स, कुकीज, स्नॅक्स आणि इतर पारंपरिक पदार्थाचा समावेश झाला. आज इंडिया स्वीट हाईस ची 50 हून अधिक दुकानं सुरू झाली आहेत. मनीकंट्रोलच्या माहितीनुसार आर्थित वर्ष 2024-25 मध्ये कंपनीने 83.10 कोटी रूपयांची उलाढाल केली. याच काळात कंपनीचा ईबीआयटीडीए 6.15 कोटी रूपये, तर निव्वळ नफा 1.83 कोटी रूपये होता.