डिलिमिटेशन बिलावर मोदींचं एका ओळीचं ट्वीट, जुना व्हिडीओ पोस्ट करून हल्लाबोल; केलं सूचक विधान!
महिला आरक्षणाच्या आड येणारे प्रत्येक संकट आम्ही मोडून काढू. आमचा विश्वास कायम आहे. या विधेयकाला पाठिंबा देणारे पक्ष महिला आरक्षणाला कधीच रोखू शकणार नाहीत, असं मोदी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

Delimitation Bill : केंद्र सरकार पुन्हा एकदा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेच्या पटलावर मांडणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत हे विधेयक पारित करण्यासाठी मोदी सरकारचा प्रयत्न आहे. विरोधी बाकावर बसणाऱ्या डीएमके पक्षाने या विधेयकाला पाठिंबा दिलाय. सोबतच शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षदेखील या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्वीट केले आहे. त्यांच्या या ट्वीटची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. आपल्या एका जुन्या भाषणाचा व्हिडीओ अपलोड करून शब्द खरा केल्याचं मोदींनी सुचवलं आहे.
मोदी यांच्या ट्वीटमध्ये नेमकं काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये आपल्या जुन्या भाषणाचा चोटासा भाग अपलोड केलाय. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक राज्यसभेत नामंजूर झाल्यानंतर मोदी यांनी देशाला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस तसेच विरोधकांवर कडकून टीका केली होती. “आमचा विश्वास अढळ आहे. देशातील समस्त नारीशक्ती आमच्या पाठीशी आहे. नारीशक्तीला भागिदारी देण्याची लढाई गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. अनेक महिलांनी आरक्षणाचा हा मुद्दा माझ्यापुढे मांडलेला आहे,” असे मोदी या व्हिडीओत बोलताना दिसतायत.
फक्त योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा
सोबतच, महिला आरक्षणाच्या आड येणारे प्रत्येक संकट आम्ही मोडून काढू. आमचा विश्वास कायम आहे. या विधेयकाला पाठिंबा देणारे पक्ष महिला आरक्षणाला कधीच रोखू शकणार नाहीत. फक्त योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा आहे, असा निश्चयही मोदींनी या व्हिडीओत व्यक्त केलाय.
दरम्यान, मोदी यांनी आम्ही नारीशक्तीला शब्द दिला होता. आम्ही हा शब्द पाळण्यासाठी बांधील आहोत असे कॅप्शनही मोदी यांनी दिलेय. त्यामुळे आता विधेयक संसदेच्या पटलावर आल्यानंतर काय होणार, इंडिया आघाडीतील सगळेच घटकपक्ष या विधेयकाला विरोध करणार की पवार गट आणि इतर पक्ष विधेयकाच्या बाजूने मतदान करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारने ससंदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे.
