AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाडांच्या लेकीने मागितली माफी; डिलमिटेशनवरून अचानक नेमकं काय घडलं?

डिलिमिटिशेनवरून राजकीय घडामोड वाढल्या आहेत. डिलिमिटेशनला विरोध दर्शवणाऱ्या आव्हाडांच्या लेकीची पोस्ट चर्चेत आली आहे. नताशा आव्हाड नेमकं काय म्हणाल्या, जाणून घ्या

जितेंद्र आव्हाडांच्या लेकीने मागितली माफी; डिलमिटेशनवरून अचानक नेमकं काय घडलं?
natasha awhadImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 2:14 PM
Share

भाजप सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक सादर करणार आहे. या विधयेकाला इंडिया आघाडीतील मतभेद उघड झाले आहे. एकीकडे डिलिमिटेशनला उघडपणे विरोध दर्शवला हे. तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशनवरून तळ्यात मळ्यात भूमिका घेताना दिसत आहे. त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पांठिबा देणार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे पक्षातील खासदारांनी अद्याप निर्णय झाला नसल्याचे जाहीर केले आहे. या विधेयकाला जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विरोध केला होता. परंतु आव्हाडांच्या कालच्या भूमिकेने नताशा यांनी भूमिका बदलली का, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. या चर्चेदरम्यान,  नताशा आव्हाड यांची यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली. यावेळी सर्वांची मनापासून माफी देखील मागितली.

नताशा आव्हाड यांची पोस्ट जशीच्या तशी 

नताशा आव्हाड म्हणाल्या, ‘कृपया माझ्या शांततेचा अर्थ माझी सहमती किंवा या गोष्टीतील सहभाग असा समजू नका. मला टॅग करणाऱ्या प्रत्येकाचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचलाय. मी तुमचं म्हणणे ऐकत आहे आणि तुमच्या भावना समजून घेतंय.  त्याबद्दल मी मनापासून माफी मागते’. नताशा आव्हाड यांच्या भूमिकेपेक्षा पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता नताशा आव्हाड काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

नताशा आव्हाड काय म्हणाल्या होत्या?

जितेंद्र आव्हाड यांची लेक नताशा आव्हाड यांनी विधेयकावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. नताशा आव्हाड म्हणाल्या होत्या की, भाजप या मुद्द्याचा वापर एका मनमानी सीमांकन विधेयकाचं समर्थन करण्यासाठी करतंय. हा थेट लोकशाहीवर हल्ला आहे. या सीमांकन विधयेकासोबत महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करे चुकीचे आणि दिशाभूल करणार आहे. महिला आरक्षण हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीच मंजूर झालं होतं. ज्यामुळे भाजपला आगामी निवडणुकीत त्याची अंमलबजावणी करण्याची संधी देखील मिळाली होती’.

Follow Us
एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
Mallikarjun Kharge vs BJP : एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गे यांचा थेट सवाल
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गेंनी उपस्थित केले गंभीर प्रश्न! बैठक संपताच...
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा.
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा केला उल्लेख, नेमकं काय म्हणाले पंतप्रधान?
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध...
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध; सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदेंमध्ये मतभेद!
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची...
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची खास रणनीती!
तुतारीच्या हातात कमळ; अंबादास दानवेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
Ambadas Danve vs Sharad Pawar : तुतारीच्या हातात कमळ; ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
Varsha Gaikwad : Delimitation Bill : इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा....
DMK : इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा, राजकीय समीकरणं बदलणार?
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले, उद्धव ठाकरेंचा निर्णय...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हे...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण