शरद पवारांच्या राष्ट्रवादीने व्हीप जारी केल्यानंतर मोठा ट्विस्ट; डिलिमिटेशनवरून पुन्हा मतभेद उघड
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने व्हीप जारी केल्यानंतर मोठा ट्विस्ट निर्माण झला आहे. राष्ट्रवादीत डिलिमिटेशनवरून पुन्हा मतभेद उघड झाले आहेत.

संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. डिलिमिटेशन विधयेक सादर करण्यासाठी विशेष अधिवशेन जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या अधिवेशनात शरद पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधयेकाच्या बाजूने मतदान करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याच मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील मतभेद उघड झाले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे.
संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून व्हिप जारी केला आहे. पक्षाने लोकसभेतील सर्व खासदारांना ३ ओळींचा व्हीप जारी केलाय. त्यांना 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा सर्वांनी द्यावा अशा दिल्या सूचना देण्यात आल्या आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशनवरून काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान डिलिमिटेशनवरून राष्ट्रवादीत दोन विचार पुन्हा चर्चेत आला आहे. दोन भिन्न विषयांची गल्लत करून त्यांच्या हातात खेळण्याची गंभीर चूक आपण करू नये, असा सल्ला नताशा आव्हाड यांनी दिला आहे.
नताशा आव्हाड काय म्हणाल्या?
नताशा आव्हाड म्हणाल्या, ‘भाजप पुन्हा एकदा या मुद्द्याचा वापर एका मनमानी सीमांकन विधेयकाचे समर्थन करण्यासाठी करत आहे, जे आपल्या लोकशाहीवर केलेला थेट हल्लाच आहे. सीमांकन विधेयकावरील चर्चेत महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणे, हे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे. महिला आरक्षण विधेयक 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच मंजूर झाले होते. ज्यामुळे भाजपला आगामी निवडणुकांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याची संधी मिळाली होती’.
दरम्यान, नताशा आव्हाड यांनी याआधी देखील शरद पवार गटाच्या डिलिमिटेशनवरील भूमिकेवर प्रश्नचिन्ह केले होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या लेकीला व्यक्तीस्वातंत्र्य असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही नताशा आव्हाड यांच्या भूमिकेवर भाष्य केलं होतं. ‘जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या मुलीची मते वेगवेगळी असतील, तर मी त्याचे स्वागत करते. नवीन पिढीचे विचार वेगळे असू शकतात. मात्र, माझ्यासाठी आई-वडिलांचा शब्द अंतिम असतो, असे सुळे यांनी म्हटलं होतं.
