AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार एनडीएत येणार की फक्त डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार? बड्या मंत्र्यांचा दावा काय? अखेर पत्ता उघड?

ज्येष्ठ नेते शरद पवार एनडीएमध्ये सामील होणार की डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान करत, पवारांनी कोणतीही भूमिका घेतली तरी त्याचे स्वागतच करू असे म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

शरद पवार एनडीएत येणार की फक्त डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार? बड्या मंत्र्यांचा दावा काय? अखेर पत्ता उघड?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2026 | 10:57 AM
Share

गजानन देशमुख, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार हे एनडीएत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र, आता या विषयात मोठा ट्विस्ट आला आहे. शरद पवार एनडीएत जाणार की डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार? अशी चर्चा सध्य रंगली आहे. त्यावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी कोणतीही भूमिका घेतली तर आम्ही त्याचं स्वागतच करू, असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर भाष्य केलं. डीलिमिटेशन विधेयकाचा निर्णय खासदार घेत असतात, त्यांच नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये हा निर्णय होणार आहे. कोणी कोणाला पाठिंबा दिला हे आज बोलण्यापेक्षा अधिवेशनातच आपल्याला सर्व दिसून येणार आहे, असं सांगतानाच शरद पवार जर एनडीएमध्ये येणार असतील किंवा या संपूर्ण बिलाला पाठिंबा देणार असतील तर त्याचं केंद्र सरकार स्वागतच करेल, असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं आहे. त्यामुळे आता शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महायुतीत तणाव नाही

अजितदादा गट आणि शिंदे सेनेत कोकणात वाद असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. तळ कोकणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकच आमदार आहेत. त्यांच्यामध्ये कुठे वाद असण्याचे काही प्रश्नच येत नाही. ते माझ्या जिल्ह्यातले नेते आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा नेते आहेत. पण त्यांच्यामध्ये कोकणात कुठे वाद आहे असं म्हणता येत नाही, असं सांगतानाच सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. रायगडमध्ये त्यांच्याबद्दल जे समज गैरसमज आहेत, तो तात्त्विक वाद आहे. त्यावर एकनाथ शिंदे हे मार्ग काढतील. महायुतीमध्ये कुठेही तणाव राहणार नाही, असं सामंत यांनी स्पष्ट केलं.

ऑपरेशन टायगर नाही

यावेळी सामंत यांनी ऑपरेशन टायगरची शक्यता फेटाळून लावली आहे. ऑपरेशन टायगर किंवा पक्षप्रवेश असं काही कुठेही सध्या दृष्टिक्षेपामध्ये नाही. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सुरू आहे आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागामार्फत शेतकऱ्यांना काय मदत करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असं त्यांनी म्हटलंय.

जरांगेंची मुलाखत पाहिली

रामदास कदम यांच्याकडील ऑडिओ क्लिपच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. मनोज जरांगे यांची पूर्ण मुलाखत मी पाहिली आहे. माझ्याकडे जशी क्लिप आहे, तशी क्लिप रामदास कदम यांच्याकडे आहे. मला जशी क्लिप मिळाली, तशीच त्यांनाही क्लिप मिळाली. ऑडिओ क्लिप देणारा एकच असू शकतो. त्याचा तपास करावा, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
देशातील लोकशाहीच्या पाठीवर; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या...
Sanjay Raut : देशातील लोकशाहीच्या पाठीवर...; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या हातात, संजय राऊतांचा मोठा दावा
शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत....
Sanjay Raut :  शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत..; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा....
Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा....
Natasha Awhad : डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा; नताशा आव्हाड असं का म्हणाल्या?
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा