AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदारांचा भाव ठरला, प्रत्येकाला 150 कोटी, दोन खासदारांवर जबाबदारी; संजय राऊत यांचा मोठा बॉम्ब

कोणी इंडिया आघाडीत असेल नसेल, पण विधेयकच राष्ट्रविरोधी आहे. हे विधेयक आणलं जातं, ते जनतेच्या हिताचं आणि लोकशाहीच्या संवर्धनाचं नाही. लोकसभेचं महत्त्व कमी केलं जात आहे. त्यामुळे आम्ही या विधेयकाला पाठिंबा देणार नाही, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

खासदारांचा भाव ठरला, प्रत्येकाला 150 कोटी, दोन खासदारांवर जबाबदारी; संजय राऊत यांचा मोठा बॉम्ब
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 27, 2026 | 10:46 AM
Share

केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. हे महिला आरक्षण विधेयक नाही. महिला आरक्षण विधेयकांच्या नावाखाली डीलिमिटेशन बिल लादण्याचा सरकारचा डाव आहे. त्यासाठी खासदार विकत घेतले जात आहेत. त्यासाठी प्रत्येक खासदारांसाठी 150 कोटी रुपयांचा भाव लावला आहे. हे व्यवहार ठरवण्यासाठी प्रत्येक राज्यात एजंट नेमले आहेत. महाराष्ट्रात झारखंड आणि आंध्रप्रदेशातील दोन खासदारांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

हे महिला आरक्षण विधेयक नाही. तर त्या नावाखाली मतदारसंघ पुनर्चना बिल लादण्याचं कारस्थान आहे. 540 खासदारांच्या जागी 850 ते 860 खासदार लोकसभेत कोंबण्याचा खटाटोप आहे. 2029ला भाजपचा पराभव होणार आहे, त्यामुळे परत सत्ता मिळवण्यासाठी त्यांचा हा डाव आहे. आतापर्यंत हे लोक ईव्हीएम आणि व्होट चोरीचा वापर करून विजयी झाले. त्यात त्यांचा भांडाफोड झाल्याने डीलिमिटेशनच्या माध्यमातून आपल्या मनाप्रमाणे मतदारसंघ तोडायचे आणि 2029 ला सत्तेत यायचं आणि परत जायचंच नाही, असा त्यांचा डाव आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

ते गद्दार ठरतील…

2026मध्ये त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. मोठ्या फरकाने बिल कोसळलं होतं. त्यानंतर संसद संस्थगित करण्यात आली. आता नवीन बिल आणत आहेत. हिवाळी अधिवेशन घेत नाहीत. खासदारांना विकत घेण्यासाठी किंवा त्यांना क्रॉस व्होटिंग करायला लावण्यसाठी 150 कोटी रुपयांचा भाव खासदारांचा ठरला आहे. जे या बिलाच्या बाजूने मतदान करतील त्यांना देश, देशाची जनता इतिहासात देशाचे गद्दार म्हणून लक्षात ठेवेल. देशाचं विभाजन होत असताना, लोकसभेचं महत्त्व कमी होत असताना, लोकांकडून सत्ता खेचली जात असताना ज्यांनी भाजप सरकारला मतदान केलं, त्यांना देशातील जनता गद्दार म्हणून लक्षात ठेवेल, असं राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे असते तर…

महाराष्ट्रात झारखंड आणि एक आंध्रप्रदेशच्या भाजपच्या खासदाराची या व्यवहारासाठी नियुक्ती केली आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर अशा प्रकारचं राष्ट्रद्रोही बिल आणण्याची त्यांची हिंमत झाली नसती. शरद पवारांची प्रकृती चांगली असती तर त्यांनीही लोकशाहीचा गळा घोटू दिला नसता. काही खासदार विकायला तयार आहेत. त्यांच्यापर्यंत रकमा पोहोचल्या आहेत. आता 2029 ला सरकारला आणायचं असल्यामुळे तिप्पट भाव लावला आहे. जे या विधेयकाच्या बाजूने मतदान करतील त्यांना 150 कोटी मिळाले हे समजून घ्यावं. 150 कोटी घेतल्याशिवाय कोणीही मतदान करणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

संपर्क सर्वांशीच होतो

या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाजपने उद्धव ठाकरेंना संपर्क साधला का? असा सवाल करण्यात आला. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संपर्क सर्वांशीच होत असतो. पण उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आणि परखड आहे. आम्ही राष्ट्रधर्म पाळणारे आहोत. ज्या मोदी आणि शाह यांनी आमचे पक्ष फोडले. त्यांना पाठिंबा कसा द्यायचा याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आम्ही रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवला, त्यांनी आमचा पक्ष फोडला. अशा लोकांच्या समर्थनार्थ कसं उभं राहता येईल? असा सवालही त्यांनी केला.

Follow Us
देशातील लोकशाहीच्या पाठीवर; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या...
Sanjay Raut : देशातील लोकशाहीच्या पाठीवर...; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या हातात, संजय राऊतांचा मोठा दावा
शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत....
Sanjay Raut :  शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत..; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा....
Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा....
Natasha Awhad : डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा; नताशा आव्हाड असं का म्हणाल्या?
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा