AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delimitation Bill: महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेवर मोठा दावा, द्रमुक आणि राष्ट्रवादीची अट काय? बिल पास होणार?

DMK and NCP on Delimitation And Women Reservation Bill 2026: एप्रिल महिन्यात दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आपटले. पण आता समीकरणं बदलताना दिसत आहे. द्रमुक आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून अनुकूल भूमिका समोर आली आहे.

Delimitation Bill: महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेवर मोठा दावा, द्रमुक आणि राष्ट्रवादीची अट काय? बिल पास होणार?
द्रमुक आणि राष्ट्रवादीची अट काय? बिल पास होणार?
| Updated on: Nov 27, 2026 | 10:51 AM
Share

DMK and NCP on Delimitation And Women Reservation Bill 2026: लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने गुरूवारी स्वतंत्र बुलेटिन जारी केले. यामध्ये आगामी चार दिवसीय संसदीय सत्राची रुपरेषा समोर आली आहे. या सत्रात प्रश्नकाळ आणि शून्यकाळ नसतील. एप्रिल महिन्यात दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आपटले होते. पण आता समीकरणं बदलताना दिसत आहे. विरोधी बाकांवरील द्रमुक आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून अनुकूल भूमिका समोर आली आहे.

सरकारला कुठून आणि कसा पाठिंबा?

राज्यसभेत एकूण 244 सदस्य आहेत. त्यातील एक जागा रिक्त आहे. विधेयक मंजरू करण्यासाठी सरकारला या वरिष्ठ सभागृहात 163 मतांची आवश्यकता आहे. तर सरकारडे अवघी 154 मतं आहेत. म्हणजे सरकारला 9 मतांची गरज आहे. विरोधी बाकावरील आणि काही इतर पक्षांची गरज भासणार आहे. बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस पार्टी यांचे अनुक्रमे पाच आणि चार सदस्य आहेत. ते सध्या कोणत्याही आघाडीत नाहीत.

द्रमुक कोणती खेळी खेळणार?

लोकसभेत द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK), द्रमुक पक्षाचे 22 खासदार आहेत. राज्यसभेत या पक्षाचे 8 सदस्य आहेत. द्रमुकने या विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण त्यासाठी अटही घातली आहे. राज्यांतील लोकसभेच्या जागांची संख्या त्याच प्रमाणात वाढवण्याचे लेखी आश्वासन पक्षाला हवे आहे. द्रमुकच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, विधेयकाच्या भाषेत बदल करण्यात आला तर आम्ही निश्चित याला पाठिंबा देण्यास तयार राहू. आम्ही उद्या अथवा त्यानंतर लगेचच बैठक घेऊ आणि पुढील रणनीती ठरवू.

द्रमुक हा तर तसा काँग्रेसचा सहकारी पक्ष आहे. पण तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने द्रमुकची साथ सोडली. विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने तामिळगा वेत्री कळघम TVK ला पाठिंबा दिला होता. त्यानंतर भाजपने डाव टाकला आहे.

शरद पवार राष्ट्रवादीची काय भूमिका?

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवार घेतील ती भूमिका मान्य असेल असे मत राष्ट्रवादीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी मांडली. विधेयकावर पक्षाच्या भूमिकेला पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा राहिल असं मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत नेतृत्वाने निर्णय घेतल्यास जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी अनुकूल असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पवारांचा पक्ष हा इंडिया आघाडीतील महत्त्वाचा पक्ष आहे. त्यांचे लोकसभेत 8 खासदार आहे. तर ताज्या अपडेटनुसार, खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षाच्या खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे. संसदेच्या या विशेष चार दिवसीय अधिवेशनात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. एप्रिलमध्ये पक्षाने या विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकासंदर्भात अटींची माहिती दिली. त्यानुसार, महिला आरक्षण लागू व्हायला पाहिजे. सर्व राज्यांतील लोकसभेच्या जागांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवली गेली पाहिजे. मतदारसंघाच्या सीमा नव्याने निश्चित करण्यासाठी जो परिसीमन आयोग स्थापन होणार आहे, त्यात विरोधी पक्षांनाही पुरेसे प्रतिनिधित्व मिळायला हवे, अशा एनसीपीच्या अटी आहेत.

Follow Us
देशातील लोकशाहीच्या पाठीवर; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या...
Sanjay Raut : देशातील लोकशाहीच्या पाठीवर...; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या हातात, संजय राऊतांचा मोठा दावा
शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत....
Sanjay Raut :  शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत..; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा....
Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा....
Natasha Awhad : डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा; नताशा आव्हाड असं का म्हणाल्या?
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा