Gold Silver Rate Today | या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी घसरले, चांदीची चमक फिक्की, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव

| Updated on: Jul 16, 2022 | 2:07 PM

Gold Rate Today : सरत्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली. सोन्याच्या किंमतीत 672 रुपये प्रति ग्रॅम तर चांदीच्या दरात प्रति ग्रॅम 1544 रुपयांची घट झाली. डॉलर मजबूत होत असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.

Gold Silver Rate Today |  या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी घसरले, चांदीची चमक फिक्की, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव
सोन्या चांदीच्या दरात घसरण
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Gold Silver Price Today News | मजबूत स्थितीतील डॉलर आणि मंदीची चाहुल यामुळे पिवळाधम्मक धातूची अर्थात सोन्याची किंमत कमालीची घसरली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या किंमती घसरत आहेत. या आठवड्यात स्थानिक वायदे बाजारात MCX वर सोन्याच्या किंमतीत (Gold Rate Today) 1/31 टक्क्यांची घसरण नोंद झाली आहे आणि सोने 50,107 रुपये स्तरावर बंद झाले आहे. गेल्या आठवड्यात हा भाव 50779 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आठवड्याचा विचार करता सोन्याच्या किंमतीत 672 रुपये प्रति ग्रॅम तर चांदीच्या दरात प्रति ग्रॅम 1544 रुपयांची घट झाली. डॉलर मजबूत होत असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. या आठवड्यात सोन्याचा वायदे बाजारातील दर 49957 रुपयांच्या पातळीपर्यंत घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोने 1706.50 डॉलर प्रति औसच्या स्तरावर बंद झाले आहे. आठवडाभरात ते 1695 डॉलरच्या पातळीवर घसरले.

राज्यातील चार शहरांतील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार(Good Return Website) मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,840 प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,600 रुपये आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,870 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,630 आहे. नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,870 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,630 आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,630 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,8700 रुपये आहे. 999 शुद्ध चांदी या आठवड्यात 54,767 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली, गेल्या आठवड्यात हाच भाव 56,427 रुपये प्रति किलो होता. या आठवड्यात चांदीच्या किंमतीत 1660 रुपये घसरण नोंदवण्यात आली.

हे सुद्धा वाचा

अशी तपासा सोन्याची शुद्धता

सोन्याची शुद्धता तुम्हाला घरबसल्या तपासता येते. BIS Care App च्या माध्यमातून तुम्ही सोन्याचा शुद्धपणा तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला सोन्यात भेसळ असल्याचे समजले अथवा सोन्याच्या व्यवहारात तुमची फसवणूक झाल्यास या अॅपवर तुम्हाला तक्रार ही दाखल करता येते. तक्रारीची दखल घेतल्यासंबंधीची माहिती ही अॅपद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.