AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold And Silver Price Today : सोने आणि चांदीचा जुलूम सुरूच आहे का? भाव वधारले की आली स्वस्ताई, काय आहेत भाव तरी?

Gold And Silver Price Today : गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीत चढउतार दिसत आहे. तेजीसह मंदीची पण लाट आली. मग आज काय आहेत सोने-चांदीचा भाव?जाणून घ्या.

Gold And Silver Price Today : सोने आणि चांदीचा जुलूम सुरूच आहे का? भाव वधारले की आली स्वस्ताई, काय आहेत भाव तरी?
सोने-चांदीचा भाव
| Updated on: Sep 26, 2025 | 10:48 AM
Share

Gold And Silver Rate Today : वायदे बाजारात (MCX) सलग दोन दिवसांपासून सोने आणि चांदीवर मंदीचे सावट आहे. तर सराफा बाजारात या दोन्ही धातुनी कहर केला आहे. दोन्ही धातुत मोठी वाढ दिसून आली. जळगावच्या सराफा बाजारातही सोने आणि चांदीने ग्राहकांना चकवा दिला. अचानक भाव गडगडले. सोने-चांदीत चढउताराचे सत्र दिसून येत आहे. तर वायदे बाजारात 26 सप्टेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ केली. सकाळी 9.30 वाजता एमसीएक्सवर सोने 174 रुपये प्रति 10 ग्रॅमने वधारले. तर चांदीत सध्या 109 रुपयांची प्रति किलो घसरण दिसली.

सोन्याचा भाव काय?

goodreturns.in नुसार, 24 सप्टेंबर रोजी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोने 32 रुपयांनी घसरले होते. तर आज सकाळी सोने 93 रुपयांनी स्वस्त झाले. 10 ग्रॅममागे सोने गेल्या दोन दिवसात 1250 रुपयांनी स्वस्त झाले. या पडझडीनंतर आज सकाळी 1 ग्रॅम सोने 40 रुपयांनी, 10 ग्रॅम सोने 400 रुपयांनी महागले. 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा भाव आज सकाळच्या सत्रात 11,488 रुपये तर 22 कॅरेट सोने 10,530 रुपये इतका आहे.

चांदीची 3000 रुपयांची झेप

22 सप्टेंबर रोजी 3000 रुपयांनी चांदी महागली. नंतर दोन दिवसांपासून गुडरिटर्न्सनुसार किंमतीत बदल दिसला नाही. तर 26 सप्टेंबर रोजी 3000 रुपयांनी चांदी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,43,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदी वधारले. 24 कॅरेट सोने 1,13,350 रुपये, 23 कॅरेट 1,12,900, 22 कॅरेट सोने 1,03,830 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 85,001 रुपये, 14 कॅरेट सोने 66,310 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,37,040 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

सोने-चांदीत महागाईचे कारण काय?

सोन्याची किंमत धडाधड वाढत असल्याने ग्राहकांना धडकी बसली आहे जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपात आणि अजून या वर्षाअखेरीस व्याजदर कपातीचे संकेत यामुळे गुंतवणूकदार सोने-चांदीकडे वळाले आहेत. मागणी आणि पुरवठ्यातील व्यस्त प्रमाणामुळे किंमती भडकल्या आहेत. व्याज दर कमी झाल्याचे परिणाम थेट डॉलर आणि बाँडवर दिसत आहे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून या दोन्ही धातुकडे वळल्याने किंमती सातत्याने वाढत आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?