AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price : शुक्रवारी सोने पुन्हा तेजीवर स्वार, चांदीची काय आहे चाल, आजचे भाव पाहा झटपट

Gold Silver Price : शुक्रवारी सोन्याचा भाव पुन्हा वधारला. चांदीची चाल मंदावली काय?

Gold Silver Price : शुक्रवारी सोने पुन्हा तेजीवर स्वार, चांदीची काय आहे चाल, आजचे भाव पाहा झटपट
सोने-चांदीचा भाव काय
| Updated on: Jan 13, 2023 | 4:41 PM
Share

नवी दिल्ली : जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय वायदे बाजारावर (Multi Commodity Exchange) दिसून आला. सोन्याच्या भावात सातत्याने वाढ दिसत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोने आणि चांदीने दम दाखवून दिला. आज बाजार सुरु होताच सोने आणि चांदीत (Gold Silver Price) वृद्धी दिसली. आज 13 जानेवारी, 2023 रोजी सोन्याचा दर 0.10 टक्क्यांनी वाढला. बाजारात सुरुवातीला 24 कॅरेट सोने आज 55,915 रुपये (Gold Price Today) होते. दुपारी 12 वाजता सोन्याच्या किंमती वाढून 55,941 रुपये प्रति 10 ग्रॅम झाल्या.

सोन्याने या आठवड्यात वृद्धी दर कायम ठेवला. तर चांदीचा भावात चढ-उतार होत आहे. सुरुवातीच्या व्यापारी सत्रात चांदीत 0.20 टक्क्यांची घसरण झाली. बाजार सुरु होताच 999 शुद्ध चांदी 68,717 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत होती.  त्यानंतर भावात वाढ झाली नाही.

त्यानंतर चांदीचा भाव पुन्हा घसरला. चांदीचा दर 68,338 रुपये प्रति किलोवर आला. तर मागील व्यापारी सत्रात सोन्यात वाढ नोंदवली गेली होती. सोने 55,875 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर चांदी काल घसरुन 68,643 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आजही घसरणीचा दिवस होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने आणि चांदीचा दर वधारला. त्यात वृद्धी दिसली. या दोन्ही धातूमध्ये आज 1 टक्क्यांची वाढ झाली. आजच्या सोन्याच्या दरात 1.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली. आज सोने 1,896.19 डॉलर प्रति औसवर कारभार करत आहे.

तर चांदीच्या भावात 1.33 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. हा भाव 23.75 डॉलर प्रति औसवर व्यापार करत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही धातूंची आगेकूच सुरु होती. पण भारतात मात्र चांदीच्या दरात घसरण झाली. चांदीत दोनदा घसरण नोंदवण्यात आली.

तर काल सराफा बाजारात सोने-चांदीच्या भावात घसरण दिसून आली. काल 24 कॅरेट सोने 56,082 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. तर चांदीची किंमत 68,754 रुपये प्रति किलो होती. त्यामुळे काल बाजारात सोने 105 तर चांदी 572 रुपयांनी घसरले.

Follow Us
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ...
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?