AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Pirce : सोन्याचा भाव तब्बल 23000 रुपयांनी घसरला, ऑगस्टपासून…चकित करणारे आकडे समोर, दागिने करण्याची हीच वेळ!

सोन्याचा भाव ऑगस्ट महिन्यात 1,64,773 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हा भाव आता 23,000 रुपयांनी कमी झालाय. दरम्यान, सध्याच्या जागतिक बाजारातील अस्थिरता लक्षात घेता सोन्यात विचारपूर्वक गुंतवणूक करावी, असे सांगितले जातेय.

Gold Pirce : सोन्याचा भाव तब्बल 23000 रुपयांनी घसरला, ऑगस्टपासून...चकित करणारे आकडे समोर, दागिने करण्याची हीच वेळ!
gold price droppedImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2026 | 8:18 PM
Share

Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. विशेष म्हणजे ही घसरण सातत्याने चालूच आहे. सोने आणि चांदीचा भाव कमी झाल्यामुळे आता सोन्यात गुंतवणूक करावी का? सोन्याचे दागिने करावेत का? असे विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरात सोने-चांदीचा भाव किती कमी झाला? सोनं घसरणीला का लागलंय? तसेच सोन्यात गुंतवणूक करावी का? हे जाणून घेऊ या….

सोन्याचा भाव किती रुपयांनी कमी झाला?

गेल्या महिन्याभराचा विचार करायचा झाल्यास सोन्याचा भाव चांगलाच कमी झाला आहे. ऑगस्ट महिन्यातील उच्चांकापासून सोन्याचा भाव तब्बल 23000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे. तर दुसरीकडे चांदीचा भाव हा ऑगस्ट महिन्याच्या सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत तब्बल 56,000 रुपये प्रति किलोने कमी झालाय. त्यामुळेच ऑगस्ट महिन्यापासून तुलना करायची झाल्यास सोन्याचा भाव 23 हजार रुपयांनी कमी झाल्याने गुंतवणूक करावी का? असा प्रश्न सामान्यांना पडलाय.

सोन्याचा भाव नेमका का घसरत आहे?

सोन्याचा भाव घसरल्याने आगामी काळातही घसरणीचा हा कल कायम असणार का? असे सामान्य लोक तसेच गुंतवणूकदार विचारत आहेत. अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे कच्चे तेल महाग होतेय. यासह जागतिक पातळीवरील तणाव यामुळे सोने आणि चांदीच्या भावात सध्या तणाव जाणवतोय. याचाच परिणाम म्हणून गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत आहेत. परिणामी सोने आणि चांदीच्या भावात घसरण होताना पाहायला मिळतेय.

ऑगस्ट ते ऑक्टोबर, भाव कसा कमी झाला?

ऑगस्ट महिन्यात चांदीचा भाव 2,48,800 रुपये प्रति किलो या उच्चाकांवर होती. शुक्रवारी चांदीचा भाव 6,800 रुपयांनी घसरून थेट 1,92,800 रुपये प्रति किलोपर्यंत कमी झाला. या हिशोबाने चांदीच्या भावात 56,000 रुपयांनी घसरण झाली. दुसरीकडे सोन्याचा भाव ऑगस्ट महिन्यात 1,64,773 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हा भाव आता 23,000 रुपयांनी कमी झालाय. दरम्यान, सध्याच्या जागतिक बाजारातील अस्थिरता लक्षात घेता सोन्यात विचारपूर्वक गुंतवणूक करावी, असे सांगितले जातेय.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...