AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आताच खरेदी करा सोनं! रेकॉर्ड पातळीवर घसरल्या सोन्याच्या किंमती, वाचा ताजे दर

आतापर्यंत सोनं रेकॉर्ड स्तरावरून 11,000 रुपये स्वस्त दरात मिळत आहे. यूएस फेडने व्याज दर न वाढवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे सोन्याच्या किंमती घसरल्या.

आताच खरेदी करा सोनं! रेकॉर्ड पातळीवर घसरल्या सोन्याच्या किंमती, वाचा ताजे दर
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 20, 2021 | 9:21 PM
Share

नवी दिल्ली : जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. कारण, आता सोन्याच्या दरात विक्रमी  घसरण झालीय. सध्या सोन्याची किंमत तब्बल 11,000 रुपयांनी कमी झालीय. यूएस फेडने व्याज दर न वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सोन्याच्या किमती घसरल्याचं सांगितलं जातंय. यामुळे सोनं खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. डॉलरची मजबुती आणि बाँडच्या उत्पन्नात वाढ झाल्याने सोन्याच्या किमतींमध्ये घसरण झालीय. (gold silver latest price gold is getting cheaper than the record level)

गुड रिटर्न्सने (वन इंडिया मनी) दिलेल्या आकडेवारीनुसार मागील अनेक दिवसांनंतर सोन्याच्या किंमती कमी झालीय. सोन्याचे दर प्रति तोळा 45,000 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज, एमसीएक्समध्ये सोन्याचा भाव एप्रिलच्या डिलीव्हरीसाठी 64 रुपयांनी घसरून 44,8877 रुपये प्रति तोळा झाला. जूनमधील सोन्याच्या डिलीव्हरीसाठी 69 रुपयांनी घसरण होऊन प्रतितोळा सोने 44,887 रुपये झालेय.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 1.9 लाख कोटी डॉलरचे पॅकेज जाहीर

साथीच्या आजाराने प्रभावित अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 1.9 लाख कोटी डॉलरचे पॅकेज जाहीर केलेय. सरकार लवकरच त्यास मान्यता देईल, अशी अपेक्षा आहे. यानंतर सोने पुन्हा चमकू शकते. परंतु तज्ज्ञांचा विश्वास असल्यास ही चमक जास्त काळ टिकू शकणार नाही आणि सोन्याची किंमत पुन्हा खाली येऊ शकते. त्याच वेळी एप्रिलमध्ये लग्नाचा हंगाम सुरू झाल्यानंतरही सोनं किंचित महाग असू शकतं, परंतु केवळ किरकोळ किंमत वाढू शकते.

सोन्यातील गुंतवणूक नेहमीच सुरक्षित राहिलीय

वर्ष 2020 मध्ये सोन्याच्या किमतीत तीव्र वाढ होण्याचे कारण म्हणजे कोरोना व्हायरस आहे, ज्यामुळे लोक गुंतवणुकीसाठी सुरक्षित स्थान शोधत होते. सोन्यातील गुंतवणूक नेहमीच सुरक्षित राहिलीय. कोरोनामुळे लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक कमी केली, कारण शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोकादायक आहे. गेल्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सोन्यामध्ये हळूहळू वाढ होत होती, परंतु मार्चमध्ये भारतात कोरोना विषाणू आल्यानंतर यास वेग आला.

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 105 रुपयांची वाढ

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी मार्केट) तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारपेठेत बुधवारी रात्री दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 105 रुपयांची वाढ झाली. सोन्याच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यामुळे चांदीची किंमत 1,738 डॉलर प्रति औंस होती. औंस प्रति औंस जवळपास राहिला. पटेल म्हणाले की, गुरुवारी कॉमेक्स (न्यूयॉर्क कमोडिटी एक्सचेंज) येथे सोन्याची स्पॉट किंमत 1,738 डॉलर प्रति औंस होती. (gold silver latest price gold is getting cheaper than the record level)

संबंधित बातम्या – 

Bank of India कडून अलर्ट! 21 एप्रिलपासून बंद होणारी ‘ही’ सुविधा, आताच करा अपडेट

Crorepati calculator : विना Risk तुम्हीही होऊ शकता लखपती, फक्त रोज करा 20 ते 50 रुपयांची बचत

Post Office Scheme : 1000 रुपयांनी सुरू करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्याला कमवाल पैसा

(gold silver latest price gold is getting cheaper than the record level)

Follow Us
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान