Gold Price Today : सोन्याची चमक फिकी,चांदीही सुळक्कन खाली.. कितीने घसरले भाव ? जाणून घ्या आजचे दर
Gold Rate Today 04 August 2026 Latest News Updates in Marathi : सराफा बाजारात मोठे बदल झाले असून सोन्या-चांदीच्या किमतींवर त्याचा परिणा दिसून येत आहे. देशातील प्रुख शहरांत सोन्याचे भाव आज किती आहेत ?

Gold Rate Today in India : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या (Federal Reserve) व्याजदर धोरणाबाबत असलेल्या अनिश्चिततेचा परिणाम आज जागतिक सराफा बाजारावर दिसून आला. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी फेड पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असून त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या मागणीत काहीशी नरमाई आली आहे. याचाच परिणाम म्हणून सलग दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज सोन्याच्या दरात किरकोळ घसरण नोंदवण्यात आली. दुसरीकडे, औद्योगिक मागणीत झालेल्या मंदीमुळे चांदीच्या दरावरही दबाव निर्माण झाला असून सहा दिवसांच्या स्थिरतेनंतर चांदीही स्वस्त झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट आणि 22 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याच्या दरात प्रत्येकी 10 रुपयांची घट झाली आहे. ही घसरण मोठी नसली तरी गेल्या दोन दिवसांपासून दर स्थिर राहिल्यानंतर झालेला हा बदल गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी आर्थिक घडामोडींवर सोन्याच्या दराची दिशा अवलंबून राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर
दिल्लीसह मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, जयपूर आणि लखनौ या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर जाहीर करण्यात आले आहेत. शहरानुसार स्थानिक कर, वाहतूक खर्च आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या दरांमुळे किंमतींमध्ये थोडाफार फरक दिसून येऊ शकतो.
| शहर | 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव | 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव | 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव |
| दिल्ली | ₹1,44,360 | ₹1,32,340 | ₹1,08,300 |
| मुंबई | ₹1,44,210 | ₹1,32,190 | ₹1,08,150 |
| कोलकाता | ₹1,44,210 | ₹1,32,190 | ₹1,08,150 |
| चेन्नई | ₹1,44,560 | ₹1,32,510 | ₹1,10,660 |
| बंगळुरू | ₹1,44,210 | ₹1,32,190 | ₹1,08,150 |
| हैदराबाद | ₹1,44,210 | ₹1,32,190 | ₹1,08,150 |
| लखनऊ | ₹1,44,360 | ₹1,32,340 | ₹1,08,300 |
| पाटणा | ₹1,44,260 | ₹1,32,240 | ₹1,08,200 |
| जयपुर | ₹1,44,360 | ₹1,32,340 | ₹1,08,300 |
| अहमदाबाद | ₹1,44,260 | ₹1,32,240 | ₹1,08,200 |
सहा दिवसांच्या स्थिरतेनंतर चांदीही स्वस्त
चांदीच्या दरात सलग सहा दिवस कोणताही बदल झाला नव्हता. मात्र आज त्यात प्रति किलो 100 रुपयांची घसरण झाली आहे. दिल्लीमध्ये एक किलो चांदीचा भाव आता 2,34,900 रुपये इतका झाला आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्येही चांदी याच दराने विकली जात आहे. यापूर्वी 28 जुलै रोजी चांदीच्या दरात तब्बल 5,000 रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर बाजारात स्थिरता होती. आता पुन्हा एकदा झालेली ही घसरण औद्योगिक मागणीतील मंदी आणि जागतिक बाजारातील हालचालींचा परिणाम मानली जात आहे.
बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने महागाईबाबत चिंता व्यक्त केल्यामुळे गुंतवणूकदार सध्या सावध भूमिका घेत आहेत. त्यामुळे मौल्यवान धातूंमध्ये मोठी खरेदी करण्याऐवजी बाजार पुढील आर्थिक संकेतांची वाट पाहत आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकेतील नॉन-फार्म पेरोल (Non-Farm Payroll) अहवाल, रोजगार बाजाराशी संबंधित इतर आकडेवारी आणि आर्थिक निर्देशांकांवर आहे. या आकडेवारीच्या आधारे अमेरिकेतील व्याजदर कमी किंवा कायम ठेवण्याबाबतचा पुढील निर्णय ठरू शकतो. त्याचा थेट परिणाम जागतिक सोन्या-चांदीच्या बाजारावर होण्याची शक्यता आहे.