Gold Rate : सोन्या-चांदीच्या किंमती तोंडचे पाणी पळविणार, मागील सगळे विक्रम मोडीत निघणार? काय आहे आजचा भाव..

Gold Rate : सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा वधारल्या आहेत. आजचे भाव काय..

Gold Rate : सोन्या-चांदीच्या किंमती तोंडचे पाणी पळविणार, मागील सगळे विक्रम मोडीत निघणार? काय आहे आजचा भाव..
आजचे दर कायImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 4:35 PM

नवी दिल्ली : सध्या लग्नसराई सुरु आहे आणि सोन्या-चांदीच्या किंमतींनी चाल बदलली आहे. सोन्याने आज वायदे बाजारात जोरदार मुसंडी मारली आहे. तर चांदीने ही मरगळ झटकली आहे. सोन्या-चांदीच्या भाव चांगलेच वधारले आहेत. मल्टी कममोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) आज सोन्याच्या भावात (Gold Price Today) 0.06 टक्क्यांची वाढ झाली तर चांदीच्या दरात (Silver price Today) आज 0.30 टक्क्यांची वाढ झाली.

आज सकाळी वायदे बाजारात सोन्याचा भाव 52,349 रुपये होता. त्यानंतर त्यात किंचित घसरण झाली. सोन्याचा भाव 52,319 रुपये झाला. चांदीच्या भावात आज वाढ किंचित वाढ झाली. चांदी प्रति किलो 61,125 रुपयांवरुन 61,166 रुपये झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून आली. ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या भावात 0.06 टक्क्यांची वाढ झाली. सोने 1,739.42 डॉलर प्रति औस झाले. तर चांदी 1.06 रुपयांनी वधारून 21.07 डॉलर प्रति औस झाले.

हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत गेल्या महिन्यात 5.25 टक्क्यांची तेजी आली. तर गेल्या 6 महिन्यात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली नव्हती. तर सोन्याच्या किंमतीत घसरण होत होती. सोन्यात 6.22 टक्क्यांची घट झाली.

भारतीय सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमती किंचित वधारल्या. तर चांदीही तेजीसह बंद झाली. सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती आज 30 रुपयांनी वाढल्या. आज सोन्याचा दर 52,731 रुपयांवर पोहचला. तर चांदीच्या दराने 856 रुपयांची उसळी घेतली. चांदीचा भाव आज 61,518 प्रति किलोग्रॅम होता.

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं.

इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.