AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today News | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याची आपटी कशामुळे?

Gold Silver Rate Today News | महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच, सोने खरेदीसाठी आजचा मुहूर्त तुम्हाला साधता येईल, कारण सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. चांदीच्या किंमतीही आटोक्यात आहेत.

Gold Silver Rate Today News | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याची आपटी कशामुळे?
सोन्याची खरेदी Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 02, 2022 | 12:46 PM
Share

Gold Silver Rate Today | सप्टेंबर महिन्याच्या (September Month) सुरुवातीला सोने दणकावून पडले आहे. सोन्याचा हा आपटी बॉम्ब सर्वांनाच धक्का देणारा असला तरी तज्ज्ञांच्या मते अमेरिकन पतधोरणाचा हा परिणाम आहे. जागतिक संकेतांमुळे भारतात सोन्याचे दर घसरत आहेत. यूएस फेडरल रिझव्‍‌र्हचे (American Federal Bank) चेअरमन जेरोम पॉवेल यांनी सेंट्रल बँक आपले प्रतिबंधात्मक धोरणात्मक उपाय सुरू ठेवणार असल्याचे जोर देऊन सांगितले. त्याचा बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. गुंतवणूकदारांचा अंदाज आहे की, अमेरिकन बँक व्याजदर 75 बेसिक पॉईंटपर्यंत वाढवू शकतो. आज जागतिक स्तरावर शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. डॉलर दिवसागणिक मजबूत होत आहे. सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today News) महिन्याच्या दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. 2 सप्टेंबर रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,400 रुपये झाला आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,620 रुपये आहे. तर चांदीच्या भावात 700 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा आजचा भाव एका किलोसाठी 52,300 रुपये इतका आहे.

सोन्याच्या किंमतीवर दबाव

अमेरिकन फेडरल बँकेने चलनवाढीला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढ करणार आहे. तसे संकेत बँकेने दिले आहेत.अमेरिकन डॉलर आणखी मजबूत झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीवर (Gold Price) दबाव वाढला आहे. अमेरिकन डॉलर निर्देशांक गेल्या दोन दशकांच्या उच्चांकावर पोहचला आहे. त्याचा परिणाम जागतिक सराफा बाजारावर दिसून येत आहे. महागाईला आळा घालण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका तजवीज करत आहे. चलनवाढ कमी करण्यासाठी व्याजदर वाढीचा प्रमुख अजेंडा राबवण्यात येत आहे.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,400 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,620 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,430 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,650 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,430 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,650 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,430 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,650 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 523 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.  सोन्याच्या प्रतीनुसार त्याच्या किंमतीतही फरक पडतो. तसेच स्थानिक कराचाही समावेश होऊन ग्राहकांना भावानुसार रक्कम द्यावी लागते.

Follow Us
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...