AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 10 ग्रॅम सोन्याचा भाव आता..

Gold Silver Rate Today : इस्त्राईल-हमास युद्धानंतर सोने-चांदी गगनाला भिडले. एकाच आठवड्यात किंमतींनी मोठा पल्ला गाठला होता. पण नवरात्रीत दोन्ही धातूंच्या किंमतीत नवलाई दिसून आली. सराफा बाजारात आता ग्राहकांची गर्दी दिसत आहे. दसरा तोंडावर आला आहे. त्यात ग्राहकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.

Gold Silver Rate Today :  ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 10 ग्रॅम सोन्याचा भाव आता..
| Updated on: Oct 18, 2023 | 2:33 PM
Share

नवी दिल्ली | 18 ऑक्टोबर 2023 : गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या किंमतींवर इस्त्राईल-हमास युद्धाचा परिणाम दिसून आला. या युद्धाचे जागतिक पडसाद उमटत आहेत. अनेक वस्तू महाग होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सोने-चांदीने तर गेल्या आठवड्यात मोठी मजल मारली. किंमतींनी मोठी झेप घेतली. जागतिक बाजारात गेल्या आठवड्यात किंमती सात महिन्यातील उच्चांकावर होत्या. त्यात 3 टक्क्यांची वाढ झाली होती. नवरात्रीत सोने-चांदीची नवलाई दिसून आली. दसरा तोंडावर आला आहे. ग्राहकांसाठी सोने-चांदीने (Gold Silver Price Today 18 October 2023) मोठी आनंदवार्ता आणली आहे.

अशी झाली दरवाढ

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) गेल्या आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी दरवाढ झाली होती. एका आठवड्यात सोन्यात 1800 रुपयांची तर चांदीमध्ये 2500 रुपयांची वृद्धी झाली होती. सोने-चांदी आता आणखी महागणार असे भाकित तज्ज्ञ वर्तवित होते. तर त्यापूर्वी दिवाळीपूर्वी सोने-चांदीत स्वस्ताईची वार्ता आली होती.

सोन्याची किंमत काय

गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्यात सोन्याने आनंदवार्ता आणली आहे. 16 ऑक्टोबर रोजी सोन्यात 340 रुपयांची घसरण झाली होती. तर 17 ऑक्टोबर रोजी सोने 160 रुपयांनी उतरले आहे. 22 कॅरेट सोने 55,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या आठवड्यात सोन्यात घसरण कायम राहिल्यास ग्राहकांचा दसरा हसरा होईल.

चांदीचा भाव काय

गेल्या आठवड्यात चांदीने कमाल केली होती. किंमतीत मोठी वाढ झााली होती. चांदीने नरमाईऐवजी चढाई केली होती. पण या आठवड्यात चांदीने दोन दिवसांपासून माघारीचे धोरण स्वीकारले आहे. 16 ऑक्टोबर रोजी किंमती स्थिर होत्या. तर 17 ऑक्टोबरला चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 73,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट असा आहे भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 59,283 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 59,046 रुपये, 22 कॅरेट सोने 53,303 रुपये, 18 कॅरेट 44,462 रुपये, 14 कॅरेट सोने 34,681 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,846 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा