AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 12 July 2024 : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोने-चांदीची उसळी, आता काय आहेत भाव तरी?

Gold Silver Rate Today 12 July 2024 : तीन दिवसांच्या उसळीनंतर सोने आणि चांदीत उसळी आली आहे. मौल्यवान धातूंचे भाव वधारले आहेत. सोमवारनंतर दोन्ही धातूंमध्ये घसरणीचे सत्र दिसले. पहिल्या आठवड्यात इतकी या धातूंना घौडदौड करता आली नाही.

Gold Silver Rate Today 12 July 2024 : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोने-चांदीची उसळी, आता काय आहेत भाव तरी?
सोने-चांदीची मुसंडी, भाव काय
| Updated on: Jul 12, 2024 | 8:34 AM
Share

आठवड्याच्या अखेरच्या सत्रात घौडदौड करण्याचा गेल्या दोन महिन्यातील ट्रेंड अजूनही कायम आहे. सोने आणि चांदीत तीन दिवसांच्या घसरणीनंतर उसळी आली आहे. चांदीने गेल्या आठवड्यात मुसंडी मारली होती. तर सोन्याने पण मोठा पल्ला गाठला होता. या आठवड्याची सुरुवात चांगली झाली. पण नंतर दोन्ही धातूत घसरण दिसली. आता आठवड्याच्या अखेरच्या सत्रात किती किंमती वाढतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. दरवाढीनंतर अशा आहेत किंमती...(Gold Silver Price Today 12 July 2024 )

सोने वधारले

या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले होते. 8 जुलै रोजी 220 तर 9 जुलै रोजी सोने 380 रुपयांनी घसरले. त्यानंतर किंमतीत बदल झाला नाही. तर 11 जुलै रोजी सोने 220 रुपयांनी वधारले. आज सकाळी पण दरवाढीचे संकेत दिसत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,357 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने मारली मुसंडी

जुलै महिन्यात चांदीने जोरदार मुसंडी मारली. पहिल्या आठवड्यात 5,000 रुपयांची भरारी घेतल्यानंतर या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र आहे. 8 जुलै रोजी चांदी 200 रुपयांनी वधारली आणि 9 जुलै रोजी 500 रुपयांनी भाव उतरले. त्यानंतर 11 जुलै रोजी चांदीने 1 हजारांची मुसंडी मारली. आज सकाळी दरवाढीचा अंदाज आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले तर चांदीची भरारी दिसली. 24 कॅरेट सोने 72,563 रुपये, 23 कॅरेट 72,273 रुपये, 22 कॅरेट सोने 66,468 रुपये झाले. 18 कॅरेट 54,422 रुपये, 14 कॅरेट सोने 42,449 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 92,204 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली