AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 18 January 2025 : सोनं 80 हजारावर, तर चांदी पण चमकली, जळगावच्या सराफा बाजारात आता भाव किती?

Gold Silver Rate Today 18 January 2025 : जळगावच्या सराफा बाजारात सोन्याने मोठी झेप घेतली तर चांदी पण चमकली. या आठवड्यात दोन्ही धातुनी उंच झोका घेतला. अखेरच्या टप्प्यात दरवाढीने ग्राहकांना घाम फोडला. 18K, 22K, 24K सोन्याचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 18 January 2025 :  सोनं 80 हजारावर, तर चांदी पण चमकली, जळगावच्या सराफा बाजारात आता भाव किती?
सोने-चांदीचा दरवाढीचा बॉम्ब
| Updated on: Jan 18, 2025 | 2:18 PM
Share

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने 80 हजार रुपयांचा टप्पा पुन्हा पार केला. शुक्रवारी सोन्याच्या दरात पुन्हा 700 रुपयांनी सोने महाग होऊन सोन्याचे दर 80 हजार 400 रुपये एवढे झाले आहेत.. जीएसटीसह सोन्याचे दर प्रतितोळा 82 हजार 812 रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या दरात तेजी आली आल्याने चार महिन्यांनंतर सोन्याचे दर 80 हजारांवर आले आहेत येत्या आठवड्यात सोन्याचे दर स्थिर राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. जळगावच्या सराफ बाजारात 48 तासात सोन्याचे दर 2 हजर 700 तर चांदीचे दर 3 हजर 700 रुपयांनी वाढले आहेत.(Gold Silver Price Today 18 January 2025 )

सोन्याचा वेलू गगनावरी

या आठवड्यात सोन्याने जोरदार मुसंडी मारली. सोमवारी सोने 420 रुपयांनी महागले. 14 जानेवारी रोजी 110 रुपयांची घसरण झाली. तर 15 जानेवारीला 110, 16 जानेवारी रोजी 550 तर 17 जानेवारी 650 रुपयांनी सोने महागले. या आठवड्यात सोने 1730 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 74,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी एकदम सूसाट

या महिन्यात चांदीने मोठी भरारी घेतली. चांदी जवळपास 5 हजारांनी वधारली. या आठवड्यात सोमवारी चांदी 1 हजारांनी वाढली. 14 तारखेला त्यात दोन हजारांची घसरण झाली. 15 जानेवारीला चांदी एक हजारांनी तर 16 जानेवारी रोजी 2 हजार रूपयांनी वधारली. आता 17 जानेवारी रोजी त्यात एक हजारांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 79,239, 23 कॅरेट 78,922, 22 कॅरेट सोने 72,583 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 59,429 रुपये, 14 कॅरेट सोने 46,355 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,820 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय