AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 19 January 2025 : लग्न सराईत सराफा बाजारात तेजीचे सत्र, सोने-चांदीचा टॉप गिअर, किंमती तरी काय?

Gold Silver Rate Today 19 January 2025 : ऐन लग्नसराईत सराफा बाजाराला भरते आले आहे. या तेजीच्या सत्रामुळे बाजारात दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. अखेरच्या टप्प्यात दरवाढीने ग्राहकांना घाम फोडला. 18K, 22K, 24K सोन्याचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 19 January 2025 : लग्न सराईत सराफा बाजारात तेजीचे सत्र, सोने-चांदीचा टॉप गिअर, किंमती तरी काय?
सोने-चांदीचा भाव काय?
| Updated on: Jan 19, 2025 | 10:00 AM
Share

नवीन वर्षात सोने आणि चांदीने जोरदार फटकेबाजी केली. जळगाव येथील सराफा बाजारात दोन्ही धातुनी ग्राहकांना घाम फोडला. ऐन लग्नसराईत दरवाढीने वधू-वर मंडळींना जादा रक्कम मोजावी लागत आहे. या आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातुनी जोरदार मुसंडी मारली. 18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीचा भाव आता असा आहे. (Gold Silver Price Today 19 January 2025 )

सोन्याची तुफान बॅटिंग

या आठवड्यात सोने 1730 रुपयांनी वधारले. सोमवारी सोने 420 रुपयांनी महागले. 14 जानेवारी रोजी 110 रुपयांची घसरण झाली. तर 15 जानेवारीला 110, 16 जानेवारी रोजी 550 आणि 17 जानेवारी 650 रुपयांनी सोने महागले. या आठवड्यात सोन्यात 1730 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 74,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 5 हजारांनी वधारली

या आठवड्यात सोमवारी चांदी 1 हजारांनी वाढली. 14 तारखेला त्यात दोन हजारांची घसरण झाली. 15 जानेवारीला चांदी एक हजारांनी तर 16 जानेवारी रोजी 2 हजार रूपयांनी वधारली. आता 17 जानेवारी रोजी त्यात एक हजारांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 79,239, 23 कॅरेट 78,922, 22 कॅरेट सोने 72,583 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 59,429 रुपये, 14 कॅरेट सोने 46,355 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,820 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय