AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोने झाले स्वस्त, तर चांदी झाली महाग; किंमतीतील अपडेट काय

Gold Silver Rate Today 28 January 2024 | या महिन्यात सोने-चांदीने मोठा दिलासा आहे. तर गेल्या आठवड्यात चांदी लकाकली आहे. तीन दिवसांत चांदीने मोठी झेप घेतली. सोने 100 रुपयांनी स्वस्त झाले तर चांदीत 1000 रुपयांची दरवाढ झाली. आता काय आहे मौल्यवान धातूंच्या किंमती

Gold Silver Rate Today | सोने झाले स्वस्त, तर चांदी झाली महाग; किंमतीतील अपडेट काय
| Updated on: Jan 28, 2024 | 8:32 AM
Share

नवी दिल्ली | 28 January 2024 : या महिन्यात सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. जानेवारी महिन्यात सोने 2200 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली. डिसेंबरच्या अखेरपासून आठवड्याच्या शेवटी किंमती वधारण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. तो या आठवड्यात पण दिसून आला. सोने शंभर रुपयांनी स्वस्त झाले तर चांदी 1000 रुपयांनी महागली. बजेटपूर्वी सोने-चांदीत नरमाईचे सूर असले तरी बजेटनंतर किंमतीत किती वाढ होते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. काय आहेत आता सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 28 January 2024)

सोन्यात किंचित वाढ

या महिन्यात सोन्यात घसरणीचे सत्र होते. तर काही दिवस किंमतीत वाढ झाली. या महिन्यात सोने 2200 रुपयांनी उतरले. या आठवड्यात पण सोन्याच्या किंमतीत नरमाई होती. 24 आणि 25 जानेवारी रोजी 50 रुपयांची घसरण झाली. तर 26 जानेवारी रोजी सकाळी दरवाढ झाली तर संध्याकाळी किंमतीत 100 रुपयांची घसरण दिसली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने गाठला मोठा पल्ला

जानेवारीत चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. या आठवड्यात पण चांदीत घसरण झाली. 23 जानेवारी रोजी 500 रुपयांची स्वस्ताई आली. तर 24 जानेवारी रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. 25 जानेवारी रोजी चांदीची किंमत 700 रुपयांनी वाढली. 26 जानेवारी रोजी किंमतीत बदल दिसला नाही. तीन दिवसांत एकूण 1000 रुपयांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले तर चांदीच्या दरात वाढ झाली. 24 कॅरेट सोने 62,312 रुपये, 23 कॅरेट 62,062 रुपये, 22 कॅरेट सोने 57,078 रुपये झाले. 18 कॅरेट 46,734 रुपये, 14 कॅरेट सोने 36,453 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,299 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?