AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : ऐन दिवाळीत सोन्याचे भाव 2 हजारांनी घसरले, वाचा आजचे दर

सोने आणि चांदीचे दर पहिल्यांदाच दिवाळीच्या काळात धनत्रयोदशी तसेच लक्ष्मीपूजनाच्या तोंडावर घसरले आहेत.

Gold Rate : ऐन दिवाळीत सोन्याचे भाव 2 हजारांनी घसरले, वाचा आजचे दर
| Edited By: | Updated on: Nov 12, 2020 | 3:25 PM
Share

जळगाव : सोने (Gold) खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Good News) आहे. कारण, धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी घसरण झाली आहे. यामुळे दिवाळीच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोने दर 51 हजार प्रतितोळ्यांवर पोहोचला आहे तर चांदीचे दरही कमी झाले आहेत. (Gold sliver Rate Gold prices fell by Rs 2000 on Diwali here is todays rate)

सोने आणि चांदीचे दर पहिल्यांदाच दिवाळीच्या काळात धनत्रयोदशी तसेच लक्ष्मीपूजनाच्या तोंडावर घसरले आहेत. इतर वेळी याच काळात सोने व चांदीचे दर वाढत असल्याचा पूर्वानुभव आहे. मात्र, जळगावात आज (गुरुवारी) सोने 51 हजार 200 रुपये प्रति तोळा (3 टक्के जीएसटी वगळून) तर चांदीचे दर 64 हजार 500 रुपये प्रतिकिलो (3 टक्के जीएसटी वगळून) असे आहेत. बुधवारी सोन्याचे भाव 53 हजारांच्या घरात गेले होते. आज दोन हजरांनी सोनं कमी झाल्याने गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.

पुण्यात सोन्याचा भाव 52 हजार रुपये तोळ्यावर पोहोचला आहे तर चांदी 65 हजार रुपयांवर आहे. ऐन दिवाळीत सोन्याचे भाव घसरल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. खरंतर, कोरोना लसीचा दावा आणि अमेरिका निवडणुकांमध्ये सोन्याच्या किंमतींसह शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला. यामुळे सतत सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, दिवाळीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सोनं खरेदी करतात. यावेळी सावधानता बाळगणं आवश्यक आहे. अनेक वेळा फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कधी खालच्या दर्जाच्या सोन्याची विक्री केली जाते तर कधी फक्त सोन्याचं पाणी लावलेलं असतं. त्यामुळे अनेकांना मोठा आर्थिक फटकाही बसला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याआधी काही गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं आहे. (Gold sliver Rate Gold prices fell by Rs 2000 on Diwali here is todays rate)

सोन्याचा भाव माहित असूद्या… जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदीसाठी मार्केटमध्ये जात असाल तर सगळ्यात आधी चालू दिवसाचे सोन्या-चांदीचे भाव माहिती असूद्या. यासाठी तुम्ही इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट https://ibjarates.com/ वर भेट देऊ शकता. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाचे भाव शोधायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाइटची मदत होईल. खरं सोनं हे 24 कॅरेटचंच असतं. पण याचा अद्याप कोणताही पुरावा नाहीये. कारण ते खूप मऊ असतं. दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो ज्यामध्ये 91.66 टक्के सोनं असतं.

दागिने खरेदी करताना हॉलमार्कची खात्री करा तुम्ही दागिने विकत घेण्यासाठी गेला असाल तर हॉलमार्कसह दागिने घेतले आहेत ना याची खात्री करा. कारण, सोनं विकताना, हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची किंमत सध्याच्या बाजारभावावर निश्चित केली जाते. म्हणून हॉलमार्कसह दागिने खरेदी करा.

इतर बातम्या – 

बचत खात्यात महिन्याला केवळ 1 रुपया जमा करा, अन्यथा 2 लाखाच्या फायद्याला मुकाल!

जनधन खात्याला आधारशी करा लिंक, अन्यथा नाही मिळणार 2.30 लाखांचा फायदा

(Gold sliver Rate Gold prices fell by Rs 2000 on Diwali here is todays rate)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...