AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुवर्णसंधी! दिवाळीआधी स्वस्तात सोनं खरेदीची संधी, सोमवारपासून सरकारची योजना सुरू

रिझर्व्ह बँक सोमवारी अर्थात 9 नोव्हेंबरपासून सॉवरेन गोल्ड बाँडची 8 वी सीरिज सुरू करणार आहे.

सुवर्णसंधी! दिवाळीआधी स्वस्तात सोनं खरेदीची संधी, सोमवारपासून सरकारची योजना सुरू
| Edited By: | Updated on: Nov 07, 2020 | 8:02 PM
Share

नवी दिल्ली : दिवाळी (Diwali) आणि धनतेरसला सोन्याची खरेदी (Buy Gold) करणं शुभ मानलं जातं. या दिवाळीत तुम्हालाही सोन्यात गुंतवणूक (Investment) करायची असेल तर सरकार तुम्हाला एक उत्तम पर्याय देत आहे. खरंतर, रिझर्व्ह बँक (RBI) सोमवारी अर्थात 9 नोव्हेंबरपासून सॉवरेन गोल्ड बाँडची (sovereign gold bold) 8 वी सीरिज सुरू करणार आहे. या योजनेंतर्गत ग्राहक 9 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत स्वस्त दरात सोने खरेदी करू शकतात. (Opportunity to buy cheap gold before Diwali governments offer sovereign gold bold 8th series starts from monday)

काय असतील सोन्याच्या किंमती? सॉवरेन गोल्ड बाँड योजनेंतर्गत 1 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 5,177 रुपये मोजावे लागणार आहे. तर दुसरीकडे जर तुम्ही ऑनलाईन सोनं खरेदी केली तर तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. याचा अर्थ असा की, सोन्याची ऑनलाइन खरेदी केली असता तुम्हाला 1 ग्रॅमसाठी अवघे 5,127 रुपये मोजावे लागतील. यासाठी 9 नोव्हेंबरपासून खरेदी करू होणार असून 13 नोव्हेंबरपर्यंत खरेदी करण्याची संधी ग्राहकांकडे आहे. तर 18 नोव्हेंबर ही याची सेटलमेंट तारीख ठरवण्यात आली आहे.

कमाल मर्यादा 400 ग्रॅम मिळालेल्या माहितीनुसार, सॉवरेन सोन्याच्या बाँड योनजेअंतर्गंत आर्थिक वर्षात कोणीही 400 ग्रॅम सोनं खरेदी करू शकतं. यामध्ये तुम्हा किमान 1 ग्रॅम सोन्यावर गुंतवणूक करू शकता. इतकंच नाही तर या योजनेत सोनं खरेदीच्या करातही सूट आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेंतर्गत जे लोक सोनं खरेदी करतात त्यांच्यासाठी पॅन कार्ड नंबर असणं अनिवार्य आहे. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष स्वरूपात सोनं मिळत नाही. हे भौतिक सोन्यापेक्षा अधिक सुरक्षित असतं.

सरकार घेणार संपूर्ण हमी सरकारच्यावतीने रिव्हर्व्ह बँकेकडून सॉवरेन गोल्ड बॉन्ड जारी केले जातात. त्यामुळे त्यात गुंतवणूकीची संपूर्ण हमी असते. सॉवरेन गोल्ड बाँडची ही आठवी सीरिज आहे. जर तुम्ही दिवाळीत सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पर्याय म्हणून सॉवरेन सोन्याच्या बाँडमध्ये तुम्ही चांगली गुंतवणूक करू शकता.

इतर बातम्या – 

सोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या ‘या’ 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान

US Election 2020: ट्रम्प यांचा जय-पराजय सोन्याच्या किमतीवर अवलंबून?, दिवाळीत 3 ते 6 टक्क्यांनी वाढेल सोनं?

(Opportunity to buy cheap gold before Diwali governments offer sovereign gold bold 8th series starts from monday)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.