US Election 2020: ट्रम्प यांचा जय-पराजय सोन्याच्या किमतीवर अवलंबून?, दिवाळीत 3 ते 6 टक्क्यांनी वाढेल सोनं?

अमेरिकेसारख्या बलाढ्या देशाच्या या निवडणुकांच्या निकालांचा शेअर बाजार आणि सोन्याच्या किंमतींवर मोठा परिणाम होणार आहे.

US Election 2020: ट्रम्प यांचा जय-पराजय सोन्याच्या किमतीवर अवलंबून?, दिवाळीत 3 ते 6 टक्क्यांनी वाढेल सोनं?

नवी दिल्ली : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. एकीकडे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर दुसरीकडे बायडेन असा वाद सध्या अमेरिकेत रंगला आहे. या सगळ्यात कोण बाजी मारणार हे तर येता काळच सांगणार आहे. पण अमेरिकेसारख्या बलाढ्या देशाच्या या निवडणुकांच्या निकालांचा शेअर बाजार आणि सोन्याच्या किंमतींवर मोठा परिणाम होणार आहे. अखेर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शेअर बाजार आणि सोन्यावर काय आणि कसा परिणाम होईल जाणून घेऊयात… (us election 2020 Donald trump connection with gold price)

काय आहे तज्ज्ञांचं मत?
केडिया अ‍ॅडव्हायझरीचे एमडी अजय केडिया यांनी टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालावरच दिवाळीतल्या सोन्याच्या किंमती अवलंबून असणार आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकांमध्ये कोणाचाही विजय झाला तरी सोन्याच्या किंमती वधारतील असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमती 3 ते 6 टक्क्यांनी वाढू शकतात.

खरंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इक्विटी लव्हर मानलं जातं. सध्या, सोन्यापेक्षा इक्विटी बाजार हा उच्च पातळीवर आहे. जर ट्रम्प अमेरिकेच्या निवडणुकीत विजयी झाले तर इक्विटी मार्केटमध्ये नफ्यातील वसुलीदेखील वाढेल. याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतींवर होणार आहे. दुसरीकडे, जर ट्रम्प निवडणूक हरले तर इक्विटी मार्केट क्रॅश होण्याचा धोका जास्त आहे. असं झालं तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक त्यांचे पैसे सोन्यात गुंतवतील. ज्यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात जर पाहिलं तर 2016 मध्ये ट्रम्प यांच्या विजयानंतर चीन आणि इराणशी झालेल्या तणावामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या. त्यामुळे जर यंदाही ट्रम्प जिंकले तर सोन्याच्या किंमती वधारतील.

सध्या फ्रान्सच्या बाबतीत मुस्लिम देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढत आहे. ट्रम्प विजयी झाल्यास जिओ पॉलिटिकल तणावात भर पडू शकते. यामुळेदेखील सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. केडिया यांच्या मते ट्रम्प जिंकल्यास ते फ्रान्सची साथ देतील त्याचा परिणामही सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या किंमतीत 3 ते 6 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

इतर बातम्या –

मुंबईतून मुलीला फूस लावून पळवून नेलं; तरुणाला आठ महिन्यांनी नांदेडमधून अटक
अशोक चव्हाणांचं ‘ते’ वक्तव्य ठरवून, समस्यांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा डाव; दरेकरांचा दावा

 

(us election 2020 Donald trump connection with gold price)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *