AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक चव्हाणांचं ‘ते’ वक्तव्य ठरवून, समस्यांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा डाव; दरेकरांचा दावा

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला (Pravin Darekar on Ashok Chavan statement)

अशोक चव्हाणांचं 'ते' वक्तव्य ठरवून, समस्यांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा डाव; दरेकरांचा दावा
| Updated on: Oct 31, 2020 | 3:43 PM
Share

मुंबई : “काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये किती अलबेल सुरु आहे, हे दिसतंय, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे (Pravin Darekar on Ashok Chavan statement). “सगळ्या प्रश्नांचं अपयश झाकण्यासाठी आठ-दहा दिवसांतून असं वक्तव्य हे नियोजनद्ध करत आहेत”, असा दावा त्यांनी केला.

काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले होते. याच वक्तव्यावरुन दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला (Pravin Darekar on Ashok Chavan statement).

“बदल्या, विकास कामांच्या निधीवरुन यांच्यात वाद होताना दिसत आहे. आपल्याकडेच फायदा व्हावा, अशा पक्षीय चढाओढीत महाराष्ट्राची जनता आणि विकासकामांकडे दुर्लक्ष होत आहे”, अशी टीका दरेकर यांनी केली.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीवरदेखील प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “आपण म्हणजे महाराष्ट्र या भ्रमातून बाहेर येण्याची गरज आहे. याआधी महाराष्ट्रातील नेते राज्यपालांना भेटले नाहीत का?”, असा सवाल दरेकर यांनी केला.

“मुख्यमंत्री न्याय देत नाहीत, भेटत नाहीत म्हणून लोक राज्यपालांकडे जाताहेत. तिकडे का जाताहेत त्याचं आत्मपरिक्षण करावं”, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.

अशोक चव्हाण काय म्हणाले होते?

“काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,” असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत दाखल झाले. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.

सत्तेत असताना आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, या मताचा मी आहे. पण दुर्दैवाने कोरोनामुळे 30 टक्केच निधी मिळाला, पण मराठवाड्याला अधिकचा निधी देण्याची माझी भूमिका असल्याची ग्वाही यावेळी अशोक चव्हाण यांनी दिली होती.

संबंधित बातम्या : 

मी तसं बोललोच नाही, अशोक चव्हाणांचा ‘त्या’ विधानावरून यू-टर्न

महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांना निधी दिला जातो, त्यात कोणतीही काटकसर नाही : अब्दुल सत्तार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.