AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 world Cup Final: अहमदबादमध्ये हॉटेल्सचा सिक्सर! रुम भाड्यात 400% वाढ, फॅन्सची एकच गर्दी, मार्केट जाम

T20 world Cup Final Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळला जाणार आहे. पण त्यापूर्वीच अहमदाबादकरांची कमाई झाली आहे. अनेक हॉटेल्स फुल्ल असून बाजारातही मोठी गर्दी उसळली आहे. या उलाढालीमुळे अनेकांना मोठा फायदा झाला आहे. काय आहे अपडेट?

T20 world Cup Final: अहमदबादमध्ये हॉटेल्सचा सिक्सर! रुम भाड्यात 400% वाढ, फॅन्सची एकच गर्दी, मार्केट जाम
टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 08, 2026 | 10:14 AM
Share

India and New Zealand Final Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद येथे टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. त्यापूर्वीच अहमदाबाद गजबजले आहे. तर येथील हॉटेलच्या किरायात, भाड्यात 300 ते 400 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. एका उद्योग प्रतिनिधीने शनिवारी याविषयीची माहिती दिली. रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा बहुप्रतिक्षित सामना होत आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक आणि क्रिकेट प्रेमी हे शहरात डेरेदाखल झाले आहेत. हॉटेल्स रुमची मागणी वाढली आहे. या सामन्यापूर्वीच अहमदाबादकरांची कमाई झाली आहे

हॉटेल्सच्या किरायात 400 टक्क्यांची उसळी

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ गुजरातचे अध्यक्ष नरेंद्र सोमानी यांनी सांगितले की या अंतिम सामन्यासाठी देशातील आणि परदेशातील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यांनी राहण्यासाठी हॉटेल्सच्या रुम बुक केल्या आहेत. काही हॉटेल्स फुल्ल झाल्याने हॉटेल रुम्सचे भाडे वाढले आहेत. यापूर्वी जी रुम 5,000 ते 20,000 रुपयांमध्ये उपलब्ध होत होती, त्यांच्या किंमतीत 300 ते 400 टक्क्यांची वाढ झाली आहे. आता या खोल्यांचे भाडे आता 15,000 ते 50,000 रुपयांदरम्यान आहे. ऑनलाईन बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे.

डिलक्स रुमचे भाडे 2 लाखांच्या पुढे

सिंधु भवन रस्त्यावरील ताज स्काईलाईनमध्ये रविवारी रात्रीच्या एका डिलक्स रुमचे भाडे 2.01 लाख रुपयांपर्यंत पोहचले आहेत. त्यावर 36,000 रुपयांचा वस्तु आणि सेवा कर (GST) वेगळा द्यावा लागेल. तर इतर साधारण खोल्याचे भाडे 9,000 ते 15,000 रुपयांदरम्यान आहेत. हे भाडे 20 पट अधिक असल्याचे सांगितले जात आहे. या सामन्यांसाठी प्रेक्षकांची आणि क्रिकेट प्रेमींची एकच गर्दी उसळल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिकांची मोठी चांदी झाली आहे. त्यांची एकाच दिवसात मोठी कमाई होण्याची शक्यता आहे. अहमदाबादमध्ये एकाच दिवसात कोट्यवधींची उलाढाल होणार आहे.

अहमदाबादमधील सर्वच श्रेणीतील जवळपास 10,000 हॉटेल रूम्स आहेत. रविवारपर्यंत यातील 80 टक्क्यांहून अधिक रूम बुक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हॉटेलचे भाडे अधिक वाढले आहेत. काही लोकांनी तर फार्म हाऊसचा पर्याय निवडला आहे. कुटुंबासह ही मंडळी या फार्म हाऊसवर डेरेदाखल झाले आहेत. कृषी पर्यटनासह सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी अनेक जणांनी ही तयारी केली आहे. त्यांना सामन्यापूर्वी आधीच लवकर निघावे लागणार आहे.

Follow Us
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.