AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर गेम फिरला, शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का, ठाकरेंचे खासदार परत येणार? दिल्लीतून मोठी अपडेट!

ठाकरे यांच्या पक्षाने व्हीप जारी केला आहे. या व्हीपनुसार ठाकरेंच्या संसदीय पक्षाची उद्या म्हणजेच 18 जून रोजी एक बैठक होणार आहे. या बैठकीला सर्वच खासदारांनी उपस्थित राहणे बंधनकारक ठरणार आहे.

अखेर गेम फिरला, शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का, ठाकरेंचे खासदार परत येणार? दिल्लीतून मोठी अपडेट!
eknath shinde and uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 18, 2026 | 2:23 PM
Share

UBT MP Revolt : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार फुटले आहेत. या बंडखोर खासदारांनी आता नवा गट स्थापन केल्याचे सांगितले जात आहे. लवकरच बंडखोर खासदारांचा हा नवा गट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील हीच फूट लक्षात घेता ठाकरे यांच्या संसदीय पक्षाने व्हीप जारी केला आहे. आता ठाकरेंच्या सर्वच खासदारांना या व्हीपचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे नेमकं काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. बंड केलेल्या एकूण सहा खासदारांपैकी एकूण 2 खासदार परत येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

ठाकरे यांच्या पक्षाकडून नेमकी काय खबरदारी घेतली जात आहे?

ठाकरे यांच्या पक्षाने व्हीप जारी केला आहे. या व्हीपनुसार ठाकरेंच्या संसदीय पक्षाची उद्या म्हणजेच 18 जून रोजी एक बैठक होणार आहे. या बैठकीला सर्वच खासदारांनी उपस्थित राहणे बंधनकारक ठरणार आहे. या बैठकीला किती खासदार येणार किती गैरहजर राहणार यावरून नेमके किती खासदारांनी बंड केले हे स्पष्ट होणार आहे. त्याआधी ठाकरे गटासाठी काहीशी दिलासादायक बाब म्हणजे सहा खासदारांपैकी दोन खासदार परत येण्याची शक्यता आहे.

दोन खासदार परत येणार?

सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत तीन खासदार आहेत. या तिन्ही खासदारांची नावे अनिल देसाई, अरविंद सावंत  आणि राजाभाऊ वाजे अशी आहेत. तर सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. त्यातील दोन खासदार परत येण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरे यांच्या बैठकीला हजर राहू शकतात. सोबतच इशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हेदेखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पत्रावर सही केलेली नाही

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते या दोन्ही खासदारांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मिळत आहे. सोबतच या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना द्यावयाच्या पत्रावर सही केलेली नाही. त्यामुळे आता नेमकं का होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...