मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण…त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून व्हीप जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या व्हीपमध्ये महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना मतदान करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी हा व्हीप जारी केला आहे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेनुसार सर्व संबंधित पदाधिकारी आणि मतदारांनी महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या व्हीपचे पालन न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून हालचालींना वेग आला आहे. पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 17, 2026 05:50 PM
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...