Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध मतदारसंघांमध्येही चर्चांना उधाण आले आहे.
राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध मतदारसंघांमध्येही चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील, वाशीमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे संजय जाधव यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस उपायुक्त अभयसिंग देशमुख यांनीही परिसराची पाहणी केली असून, परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.
या राजकीय घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाला कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 17, 2026 05:21 PM
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..

